सुप्रिया सुळे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवर केलेल्या आरोपानंतर भाजपाने पलटवार केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस(पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर माध्यमांचा आवाज दाबण्यासाठी कार्यकर्त्यांना धडे देत असल्याचा आरोप केला आहे. ज्या आरोपाला भाजपाकडूनही जोरदार पलटवार केलागेला आहे. when will you apologize for that irresponsibility Direct question to Supriya Sule of BJP
भाजपाने म्हटले आहे की, ”सुप्रिया ताई लोकशाहीचा चौथ्या स्तंभ राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवतो हे तुम्ही मान्य केलं याबद्दल आपले आभार. कारण तुम्ही ज्या इंडी आघाडीत आहात त्यांनी १४ पत्रकारांवर बहिष्कार टाकला आणि पुन्हा आणीबाणी लादली.एवढंच नाही तर यापूर्वी सत्तेत असताना तुम्ही पत्रकारांना कशा पद्धतीने घरातून उचलून अटक केली. करोना काळात त्यांच्यावर कसे गुन्हे दाखल केले हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. तुमचं मविआ सरकार असताना विरोधात बोललं म्हणून संपादक अर्णब गोस्वामी यांना तुरुंगात डांबलं, बातमी दिली म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अटक केली, अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखल केले.”
याचबरोबर ”लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली त्या बेजबाबदारपणाबद्दल कधी माफी मागणार? राहिला प्रश्न बातमीचा तर पत्रकारांशी संवाद साधणं, सरकारनं, पक्षानं केलेल्या कामाची माहिती देणं यात काय चूक आहे? कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी संपर्कात राहून पक्षाची भूमिका मांडली पाहिजे. नाही तर माध्यमातून एकतर्फी भूमिका लोकांसमोर येईल.” असं भाजपाने म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या? –
”विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळे जी कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App