‘NDA’शी जवळीक असल्याच्या प्रश्नावर नितीश कुमारांनी दिलं उत्तर, म्हणाले…


…याकडे विरोधकांचे हरियाणातील शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. हरियाणातील देवीलाल यांच्या जयंतीनिमित्त इंडियन नॅशनल लोकदल (INLD) च्या कार्यक्रमापासून त्यांनी स्वतःला दूर केले, ज्यामध्ये सर्व मोठे विरोधी नेते उपस्थित राहणार होते. त्याऐवजी नितीश कुमार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाटणा येथे पोहोचले. त्यामुळे  नितीश कुमार यांची एनडीएशी जवळीक वाढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. असे असताना आता नितीशकुमार यांनी एनडीएशी जवळीक असल्याच्या प्रश्नावर स्पष्टीकरण  दिले आहे. Nitish Kumar replied to the question of being close to NDA

एनडीएशी जवळीक असल्याच्या बातम्यांवर नितीश कुमार म्हणाले की, “तुम्हाला माहित आहे की आम्ही विरोधी आघाडी एकत्र केली. कोण काय म्हणतं हे आम्हाला माहीत नाही.” देवीलाल यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित न राहण्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता, नितीश यांनी त्यांना कल्पना नसल्यासारखी प्रतिक्रिया दिली. मात्र, मंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की, आज हरियाणात एक कार्यक्रम आहे. . यानंतर नितीश म्हणाले की, कोण काय म्हणतो याने आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही सर्व प्रकारे काम करत आहोत.

चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त इंडियन नॅशनल लोक दलाने कैथलमध्ये मोठी रॅली आयोजित केली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशिवाय इतर नेतेही इनेलोच्या या रॅलीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याकडे विरोधकांचे हरियाणातील शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.

या कार्यक्रमात नितीश कुमार यांनाही सहभागी व्हायचे होते. मात्र नितीशकुमार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते पाटण्यात पोहचले. नितीश कुमारांच्या या पावलावर जेडीयूनेही प्रतिक्रिया दिली आहे. जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, नितीश कुमार आपल्या पूर्वजांचा आदर करतात. विशेष म्हणजे नितीश कुमार यांनी आज मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली आहे, तर बिहारमध्ये कॅबिनेटची बैठक सहसा मंगळवारी होते.

Nitish Kumar replied to the question of being close to NDA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात