आनंदाची बातमी : २०१९ मध्ये MPSC उत्तीर्ण ४१३ विद्यार्थ्यांना २०२१ मध्ये मिळाले नियुक्ती पत्र, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण


विशेष प्रतिनिधी

मुंबई : 2019 मध्ये MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण 413 विद्यार्थ्यांना नियुक्ती लेटर आत्ता 2021 मध्ये मिळाले आहे. लवकरच म्हणजे 17 जानेवारी पासून ह्या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग सुरू होणार आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी ही अतीशय आनंदाची बातमी आहे. मात्र 2019 मध्ये निकाल लागून अजूनही नियुक्ती नाही म्हणून ह्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. 413 students who passed MPSC in 2019 received appointment letters in 2021

2 वर्ष नियुक्ती नाही म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता. 28 सप्टेंबर 2021 रोजी या 2019 मधील परीक्षेचा सुधारीत निकाल जाहीर करण्यात आला होता. यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा 413 पदांचा समावेश आहे.



हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील रखडलेल्या अनेक मुद्द्या विरूध्द आवाज उठवला होता. त्यापैकी MPSC विद्यार्थ्यांना नियुक्ती न मिळणे हा देखील एक मुद्दा त्यांनी उचलून धरला होता.
तर आता नियुक्ती लेटर्स मिळाल्यामुळे एक प्रश्न सुटला आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये तरी आनंदाचे वातावरण सध्या आहे.

413 students who passed MPSC in 2019 received appointment letters in 2021

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात