प्रतिनिधी
मुंबई : बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीने समितीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्रातल्या विविध नेत्यांची भेट घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. Maharashtra Integration Youth Committee delegation discusses with Pawar-Fadnavis
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याबाबत फडणवीस यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांना सीमाप्रश्न सोडविण्यास संदर्भात प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या फेसबुक पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या शिष्टमंडळाने आज प्रदेश भाजप कार्यालयात माझी भेट घेतली आणि त्यांच्या विविध समस्या कथन केल्या. यासंदर्भात मी मा. केंद्रीय अमित शाह जी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करणार आहे. सीमावासियांना संपूर्ण न्याय मिळवून देईन, हे आश्वस्त केले. सीमावर्ती भागातील सर्व मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र भाजपा संघटना ठामपणे उभी आहे आणि राहील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App