वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरात मधल्या विविध बंदरांवर अमली पदार्थ सापडण्याचा सिलसिला अजून थांबलेला नाही. गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ७५.३ किलो हेरॉइन जप्त केले आहे. कच्छ जिल्ह्यामध्ये अदानी समुहाच्या मलकीच्या मुंद्रा बंदराजवळ आढळून आलेल्या एका कंटेनरमध्ये ३७६ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे हे अमली पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.376 crore heroin seized near Adani’s Mundra port in Gujarat; Ready to send to Punjab !!
गुजरात एटीएस आणि पंजाब पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षकांनी या कंटेरनमध्ये संशयास्पद वस्तू असल्याच्या शक्यतेने केलेल्या छापेमारीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती गुजरात पोलिसांचे डीजीपी आशिष भाटिया यांनी दिली आहे.
हा सर्व माल १३ मे रोजी मुंद्रा बंदरामध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील अजमान फ्री झोनमधून हा माल मुंद्रा बंदरामध्ये आणला होता. हा माल पंजाबमध्ये पाठवण्याची तस्करांची तयारी होती. या कंटेरनमधील अंमली पदार्थ लपवण्यासाठी कार्डबोर्डचे पाईप वापरले होते. हे पाईप कार्डबोर्डचे वाटू नयेत म्हणून त्यावर निळ्या रंगाचे प्लास्टिक लावून हेरॉइन लपवण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलिसांनी सांगितले.
आधी केले होते 3000 किलो जप्त
गुजरातमधील याच बंदरावरुन १५ सप्टेंबर २०२१ रोजी तीन हजार किलो अमली पदार्थ पकडले गेले होते. त्यावेळीही हे बंदर आणि या बंदराची मालकी असणारा अदानी समूह चांगलाच चर्चेत आला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App