पंजाबच्या जनतेच्या पैशावर आपचा गुजरातमध्ये प्रचार, भगवंत मान यांचा विमान दौरा सरकारला पडला ४५ लाख रुपयांना

पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता येथील जनतेच्या पैशावर आपले गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील प्रचाराचे इमले बांधण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या 1 ते 3 एप्रिल दरम्यान गुजरातच्या राजकीय दौऱ्यासाठी भाड्याने घेतलेल्या खाजगी विमानाची 45 लाख रुपयांची बिले पंजाब नागरी हवाई वाहतूक विभागाला मिळाली आहेत. AAp campaign in Gujarat on the money of the people of Punjab, Bhagwant Mann’s plane tour cost the government Rs 45 lakh


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता येथील जनतेच्या पैशावर आपले गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील प्रचाराचे इमले बांधण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या 1 ते 3 एप्रिल दरम्यान गुजरातच्या राजकीय दौऱ्यासाठी भाड्याने घेतलेल्या खाजगी विमानाची 45 लाख रुपयांची बिले पंजाब नागरी हवाई वाहतूक विभागाला मिळाली आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आम आदमी पक्षाचे (आप) सुप्रीमो आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत डिसेंबरमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या पक्षाच्या प्रचाराची सुरुवात करण्यासाठी गुजरातला भेट दिली होती. आरटीआय कार्यकर्ते हरमिलाप सिंग ग्रेवाल यांनी मान यांच्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यांवर खर्च केलेल्या रकमेबाबत तपशील मागितला होता. उत्तरात, पंजाब नागरी उड्डाण विभागाने खुलासा केला आहे की पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या तीन दिवसांच्या गुजरात दौºयासाठी भाड्याने घेतलेल्या विमानासाठी विभागाला 44,85,967 रुपयांची बिले प्राप्त झाली आहेत.मान यांनी 6 एप्रिल रोजी राज्य सरकारच्या हेलिकॉप्टरमधून हिमाचल प्रदेशाचा दौराही केला होता. मात्र, हेलिकॉप्टरच्या वैयक्तिक भेटीवर किती खर्च झाला हे सांगता येत नाही, असे आरटीआयच्या उत्तरात म्हटले आहे.

सत्तेत येण्यापूर्वी मान तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची पंजाबमध्ये हेलिकॉप्टर वापरल्याबद्दल टर उडवित होते. मात्र, आता सत्तेवर आल्यावर मान दुसºया राज्यात भेट देण्यासाठी खाजगी जेट भाड्याने घेत आहेत, अशी टीका ग्रेवाल यांनी केली आहे. ते म्हणाले, मान यांचा गुजरात आणि हिमाचलचा दौरा निव्वळ पक्षाच्या प्रचारासाठी होता. राज्य सरकारच्या कामकाजाशी किंवा पंजाबच्या फायद्यासाठी त्यांचा काहीही संबंध नव्हता.

गुजरात दौºयात मान आणि केजरीवाल यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली होती. त्याचसोबत अहमदाबादमध्ये रोड शोही केला होता. गुजरात आणि हिमाचलमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न आप करीत आहे.

ग्रेवाल हे आपचे कार्यकर्ते होते. मात्र, त्यांनी पक्ष सोडून भटिंडा येथून संयुक्त समाज मोचार्चे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

AAp campaign in Gujarat on the money of the people of Punjab, Bhagwant Mann’s plane tour cost the government Rs 45 lakh

महत्वाच्या बातम्या