विशेष प्रतिनिधी
मुबंई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला न्यायालयाने फक्त व्हॉट्सअॅप चाटच्या आधारावर अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यन कडुन कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले नव्हते, असा दावा केला होता. या सर्व प्रकरणामध्ये अशा बऱ्याच चर्चा रंगत असताना, रोज नवे आरोप प्रत्यारोप चालू असताना, आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर आरोप केले आहेत.
3000 kg of narcotics were found at Adani Mundra port, why no action was taken against them? BJP government’s attempt to create controversy among Hindus and Muslims: Nana Patole
नाना पटोले म्हणतात, एनसीबीने ज्या पध्दतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्यावरून हे साफ लक्षात येते की दाल मे कुछ काला है. या सर्व प्रकरणामुळे हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करणे हा एकच उद्देश भाजप सरकारचा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. देशातील सर्वात मोठय़ा नायकाच्या मुलाच्या विरोधात षडयंत्र करून हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
फडणवीस यांची शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा असेल, तर केंद्र सरकारच्या महाराष्ट्रासोबतच्या दुजाभावाविरुद्ध दिल्लीत जाऊन काम केले पाहिजे -नाना पटोले
‘अदानी मुद्रा बंदरावर 3000 किलो अमली पदार्थ सापडले होते. त्या अमली पदार्थांचे पुढे काय झाले? त्यांच्यावर कोणती कारवाई केली गेली नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचविण्यासाठी व अदानी मुद्रा बंदरावर सापडलेल्या अमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही मुंबईत कारवाई केली जात आहे. असा सणसणीत आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
फक्त व्हॉट्सअॅपच्या च्या आधारावर कोणी अंमली पदार्थांचे विक्रेते आणि पुरवठादार आहेत हे तुम्ही कसे सिद्ध करु शकता? असा प्रश्न काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी आजवर केला आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करणे, महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे, मुंबईमध्ये दहशत निर्माण करणे असे आरोप कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहेत. आर्यन खानची न्यायालयिन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App