फडणवीस यांची शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा असेल, तर केंद्र सरकारच्या महाराष्ट्रासोबतच्या दुजाभावाविरुद्ध दिल्लीत जाऊन काम केले पाहिजे -नाना पटोले


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आणि या हिंसाचाराच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा असलेल्या सहभाग लक्षात घेता काँग्रेसने अजय मिश्रा यांना पदावरून काढून टाकावे यासाठी आज राजभवनामध्ये काँग्रेस नेत्यांची मूक आंदोलन केले. काँग्रेस नेत्यांनी राजभवनात जाऊन अजय मिश्रा यांना पदावरून काढून टाकण्यात यावे यासंदर्भात राज्यपालांकडे तसे निवेदनही दिले आहे.

If Fadnavis wants to help farmers, then he should go to Delhi and work against Central Government’s malpractice with Maharashtra: Nana Patole

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या महाराष्ट्र राज्य सरकारविरूद्ध शो दुजाभाव आहे, याबाबत फडणवीस कधीही बोलत नाहीत. जेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकार कडे 15 हजार कोटींची मागणी केली आहे. त्याला नाममात्र पैसे देण्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे.


नाना पटोलेंचा थेट उच्च न्यायालयात दावा , म्हणाले – नितीन गडकरी यांनी उत्पन्नाची खरी माहिती लपवली


महाराष्ट्र शासनासोबत होत असणाऱ्या ह्या दुजाभावाचे आरोप करताना नाना पाटोळे म्हणतात की, ‘देवेंद्र फडणवीस यांना जर राज्य सरकारला आणि राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल अशी जर इच्छा असेल तर त्यांनी केंद्रसरकार कडे जाऊन महाराष्ट्रात राज्याला जास्तीत जास्त मदत होईल यासाठी काम करायला हवे. मात्र ते तसे करताना दिसून येत नाहीत.’

लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या विरूध्द आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बंद पुकारला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. मावळ येथे झालेल्या घटनेवरून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला निशाणा साधला होता.

यावर नाना पटोले म्हणाले की, मावळच्या घटनेचा काँग्रेसने मोठ्या प्रमाणात निषेध केलेलाच होता. राहुल गांधीनी त्याठिकाणी स्वतः जाऊन पीडितांची भेट घेतली होती. पोटात एक वेगळे आणि ओठात एक वेगळे अशी काँग्रेसची भूमिका कधीच राहिली नाही. लखीमपूरच्या घटनेनंतर नेत्या प्रियांका गांधी यांचे अपहरण केले गेले आणि याचे समर्थन भाजप नेते करताना दिसून आले. हे अतिशय दुखद आहे. महिलांचा विरोध करणे, शेतकरी व्यापाऱ्यांचा विरोध करणे याचे समर्थन भाजप करताना दिसून येते हे चुकीचे आहे. असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

If Fadnavis wants to help farmers, then he should go to Delhi and work against Central Government’s malpractice with Maharashtra: Nana Patole

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात