वृत्तसंस्था
मुंबई : रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला असला आणि त्या नोटा बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या अन्य केंद्रांमधून बदलून घेण्याची मुभा 23 मार्च 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ठेवली असली 2000 च्या नोटांची कायदेशीर वैधता 30 सप्टेंबर 2023 नंतरही चालूच राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. 2000 notes will continue to be legally valid even after 30 September 2023
2000 च्या नोटा मागे घेताना रिझर्व्ह बँकेने देशातल्या बँकांना विशिष्ट सूचना दिल्या आहेत. त्यापैकी प्रामुख्याने ग्राहकांना नव्याने 2000 च्या नोटांचे वितरण बंद करावे, तसेच ग्राहकांकडे सध्या अस्तित्वात असलेल्या 2000 च्या नोटा बदलून देण्याची मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दिल्याने त्यांना तोपर्यंत बँका आणि रिझर्व्ह बँकेची केंद्रे यातून नोटा बदलून द्याव्यात, अशा सूचना आहेत. सुमारे 4.15 महिन्यांची ही मुदत देशात उपलब्ध असलेल्या 2000 च्या सर्व नोटा बँकांमध्ये परत येण्यासाठी पुरेशी असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. त्या ऊपर जरी 2000 च्या नोटा नागरिकांकडे राहिल्या तरी त्यांची कायदेशीर वैधता समाप्त होणार नाही, असे रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
2019 पासून 2000 च्या नोटांची छपाई मुळातच रिझर्व्ह बँकेने बंद केली आहे. पण नोटबंदी नंतर ज्या 2000 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने सुरू केल्या होत्या, त्या 31 मार्च 2018 रोजी एकूण चलनाच्या 37.3 % म्हणजे 6 लाख 73 हजार कोटी रुपये मूल्याच्या अस्तित्वात होत्या. त्याचे प्रमाण घटून 31 मार्च 2023 रोजी एकूण नोटांच्या 10.8 % उरून त्या 3 लाख 62 हजार कोटी रुपये मूल्याच्या शिल्लक राहिल्या होत्या.
याचा अर्थ टप्प्याटप्प्याने रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा प्रत्यक्ष व्यवहारातून कमीच केल्या होत्या. आता उरलेल्या 4:15 महिन्यांमध्ये सध्या व्यवहारात असलेल्या 2000 रुपयांच्या सर्व नोटा बँकांमध्ये परत येण्याची रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे. पण 30 सप्टेंबर 2023 नंतरही त्या नोटांची कायदेशीर वैधता कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App