विरोधी ऐक्याची 20 लाख कोटींच्या घोटाळ्याची गॅरंटी, पण घोटाळेबाजांवर कायद्याचा वरवंटा चालवण्याची पंतप्रधान मोदींची गॅरंटी!!


वृत्तसंस्था

भोपाळ : आपल्या यशस्वी अमेरिका आणि इजिप्त दौऱ्याहून भारतात परत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपच्या 10 लाख बूथ कार्यकर्त्यांना भोपाळ मधून संबोधित केले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची प्रश्न उत्तरे देखील दिली. भाजपचे सर्व विरोधक एकत्र येऊन लढत आहेत त्यांना जबाब कसा द्यायचा??, या प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी सर्व विरोधकांवर आपल्या स्टाईलने घसरले. गुजरात मधल्या कार्यकर्तीच्या प्रश्नाला त्यांनी अशा पद्धतीने उत्तर दिले की ज्यामुळे लाखो कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह भरला.20 Lakh Crore Scam Guarantee of Opposition Unity

पंतप्रधान मोदी म्हणाले, की आजकाल सगळीकडे एक शब्द ऐकायला येतो, तो म्हणजे गॅरंटी. पाटण्यात जमलेल्या सर्व विरोधकांची 20 लाख घोटाळे कोटींच्या घोटाळ्यांची गॅरंटी आहे. पण या मोदीची पण गॅरंटी आहे, घोटाळ्यांच्या विरोधातली कारवाई थांबणार नाही. घोटाळेबाजांवर कायद्याचा वरवंटा चालवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.हे सर्व विरोधक स्वतःचा परिवार वाचवण्यासाठी एकत्र आले कारण या सर्वांनी लाखो करोडो कोटी रुपयांचे वेगवेगळे घोटाळे केले. टुजी घोटाळा, चारा घोटाळा, कोयला घोटाळा, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा ही सगळी रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत आणि त्या घोटाळ्यांपासून बचावासाठी, तुरुंगवारी टाळण्यासाठी ते एकत्र आले आहेत. पण या सर्व विरोधकांची जर घोटाळे करण्याची गॅरंटी असेल, तर या मोदीची सुद्धा एक गॅरंटी आहे, या घोटाळेबाजांना सोडणार नाही. त्यांच्याविरुद्धची कारवाई थांबवणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी उत्तर दिल्यावर लाखो कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.

यावेळी मोदींनी सर्व विरोधी नेत्यांची नावे घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेला समजावून सांगावे की तुम्हाला गांधी परिवार, मुलायम परिवार, लालू परिवार, पवार परिवार करुणानिधी परिवार, केसीआर परिवार यांच्या मुलांचे भले करायचे असेल, तर तुम्ही त्यांच्या पक्षांना मत द्या. पण जनसामान्यांच्या मुलांचे, नातवंडांचे, पतवंडांचे भले करायचे असेल, तर भाजपला मते द्या. हे भाजपच्या प्रत्येक बूथ कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन सांगितले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या आवाहनानंतर लाखो कार्यकर्त्यांनी उभे राहून पंतप्रधानांचे विशेष अभिनंदन केले. सर्व विरोधकांवर प्रखर हल्ला करण्यासाठी मोदींनी त्यांची नावे घेऊन भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या हातात मोठे शाब्दिक हत्यार दिले.

20 Lakh Crore Scam Guarantee of Opposition Unity

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात