ज्या अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगली तिथल्या पोर्ट ब्लेअर विमानतळावर सावरकरांचा 18 फुटी पुतळा; मोदी करणार अनावरण


प्रतिनिधी

मुंबई : ज्या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जन्मठेपेची शिक्षा भोगली, त्याच अंदमानच्या पोर्ट ब्लेअर विमानतळावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 18 फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाच्या उद्घाटनासोबतच वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे, अशी माहिती आहे. हा पुतळा पद्मविभूषण राम सुतार यांनी बनविला आहे. हिंदुस्थान पोस्टने ही बातमी दिली आहे. 18 feet statue of Savarkar at Port Blair Airport

राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अंदमान निकोबारची राजधानी पोर्टब्लेअर येथील वीर सावरकर या विमानतळावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला होता. प्राधिकरणाने हा पुतळा बनविण्याची जबाबदार प्रख्यात मूर्तीकार पद्म विभूषण राम सुतार यांना दिली होती.

अनिल सुतार यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 18 फुटांचा पुतळा तयार झाला असून तो गेल्या 22 मे रोजी विमानतळावर उभारण्यात आला आहे. सध्या पोर्टब्लेअर येथील वीर सावरकर विमानतळाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा प्राधिकरणाच्या अधिका—यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. सोबतच मोदी सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरणही करणार आहेत.

सावरकरांच्या फोटोच्या जागी मूर्ती आली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच भव्यदिव्य पध्दतीने साजरा करण्यात आला. तसं बघितलं तर, महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते. दरवर्षी फोटोला हार घालून आदरांजली वाहिली जाते. परंतु यंदा सावरकर यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. नवीन महाराष्ट्र सदनात खूप मोठ्या प्रमाणावर पुष्प सजावट करण्यात आली होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फोटोच्या जागी तीन फुटांची मूर्ती ठेवण्यात आली होती.

ही मूर्ती पोर्टब्लेअर येथे बसविण्यात आलेल्या 18 फुटांच्या पुतळ्याची प्रतिकृती होती. जयंतीदिनी सावरकर यांची मूर्ती आणण्याची योजना महाराष्ट्र सदनचे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त डॉ. राजेश अडापवर यांची होती. डॉ. अडापवार यांनीच आपल्याला फोन करून सावरकर यांची मूर्ती आहे काय? अशी विचारणा केली होती. आपल्याकडे तीन फुटांची मूर्ती आहे असे त्यांना सांगितले आणि ते ही मूर्ती जयंतीदिनासाठी घेवून गेले, असे अनिल सुतार यांनी सांगितले.

18 feet statue of Savarkar at Port Blair Airport

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात