मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा!

आपत्तीप्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल मॅपिंग करण्यासह अनेक महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आज सर्वंकष आढावा घेण्यात आला.  येत्या पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. Chief Minister Eknath Shinde reviewed the premonsoon preparations of all systems

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय निर्देश दिले? –

आपत्तीप्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल मॅपिंग करा. प्रतिसाद आणि शोध-बचाव आणि सुटका यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांची मदत घ्या. यापूर्वीच भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधा. पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतील, तर त्यांची माहिती घ्या. भूस्खलन, दरडी आणि जमीनीच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचाली या भागातील नागरिकांना माहित असतात. त्याबाबत त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच तयारी करा.

याचबरोबर, स्थलांतरितांसाठी बहुउद्देशीय सभागृहे, शाळा किंवा तत्सम निवारे उपलब्धता याबाबत तयारी करून ठेवावी. याठिकाणी आवश्यक अन्न-धान्य तसेच औषधांचा साठा याबाबत संबंधित विभागांना आतापासूनच काळजी घ्यावी. पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावात आतापासूनच औषधांचा पुरेसा साठा राहील, असे पहावे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणीही तयारी ठेवा. संर्पदंशावरील लसी उपलब्ध राहतील, याची खात्री करा. असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Chief Minister Eknath Shinde reviewed the premonsoon preparations of all systems

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात