विशेष प्रतिनिधी
पुणे: शिक्षण विभागाने यंदाच्या एकूण शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत देण्याच्या घेतलेल्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. 15% reduction in admission fee for class XI
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्कात १५ टक्के कपात करून शुल्क जाहीर करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रवेश प्रक्रियांमध्ये राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी कपात केलेल्या शुल्कानुसार शुल्क घ्यायचे आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने शाळा-महाविद्यालयातील सुविधांचा वापर होत नाही. तरीही शाळा-महाविद्यालयांकडून पूर्ण शुल्क आकारले जाते. या विरोधात जयश्री देशपांडे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानमधील याचिकेवरील १५ टक्के शुल्क कपातीच्या निर्देशांचा संदर्भ देऊन कार्यवाही करण्याचा आदेश राज्य शासनाला दिला. त्यानुसार शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी एकूण शैक्षणिक शुल्कात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. त्याचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने या संदर्भात कार्यवाही करून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशासाठीच्या शुल्कात १५ टक्के कपात करून शुल्क जाहीर केले आहे. विद्यार्थी आणि पालकांनी त्यानुसार शुल्क भरायचे आहे. विद्यार्थी-पालकांना अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांचे शुल्क संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App