आसामात कॅश फॉर जॉब स्कॅममध्ये 15 अधिकारी निलंबित; स्पर्धा परीक्षेत चुकीच्या पद्धतीने पास झाल्याचा आरोप


वृत्तसंस्था

गुवाहाटी : आसाम सरकारने राज्य लोकसेवा आयोगाच्या (APSC) कॅश फॉर जॉब्स घोटाळ्याप्रकरणी 15 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. 2014 च्या आसाम लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पैसे देऊन नोकरी मिळवल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे.15 officials suspended in cash-for-job scam in Assam; Allegation of wrongly passing the competitive examination

निलंबित अधिकाऱ्यांपैकी 11 जण आसाम पोलिस सेवेत (एपीएस) तर 4 जण आसाम सिव्हिल सर्व्हिसमध्ये (एसीएस) नियुक्त करण्यात आले आहेत. यातील दोन एपीएस अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. दोघेही डीएसपी पदावर होते.



2016 मध्ये ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी APSC चे तत्कालीन अध्यक्ष राकेश कुमार पॉल यांच्यासह सुमारे 70 जणांना, 50 अधिकाऱ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. अतिरिक्त DGP (CID) मुन्ना प्रसाद गुप्ता SIT चे नेतृत्व करत आहेत. सरकारने त्यांना सहा महिन्यांत गुवाहाटी उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

15 officials suspended in cash-for-job scam in Assam; Allegation of wrongly passing the competitive examination

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात