वृत्तसंस्था
नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सध्या बऱ्याच “पोलिटिकली ऍक्टीव्ह” झाल्या आहेत. बंगालच्या निवडणूकीत ममताउदय झाल्यापासून त्या अस्वस्थ असल्याचे बोलले जातेय. संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे नेतृत्व ममतांकडे जाण्याचा धोका त्यांना वाटतोय. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये बरीच राजकीय सक्रीयता दाखवायला सुरूवात केली आहे. 12 Opposition leaders write to PM Modi, blame govt for ‘apocalyptic human tragedy’
याच राजकीय सक्रीयतेचा एक भाग म्हणून सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या १२ नेत्यांना हातीशी धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने एक “पत्रबाण” सोडला आहे. अर्थात त्यांना पत्र लिहिले आहे. कोरोना फैलाव रोखण्यात तसेच राज्यांना त्यांच्या मागणीनुसार वैद्यकीय सुविधा पुरविण्यात केंद्र सरकारला घोर अपयश आल्याचे टीकास्त्र या पत्रातून सोडण्यात आले आहे. ज्या केंद्र सरकारवर हे टीकास्त्र सोडण्यात आलेय त्याच्याचकडे नऊ कलमी मागण्यांची यादीही देण्यात आली आहे. हे या पत्राचे वैशिष्ट्य आहे. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.
सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App