वृत्तसंस्था
रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्या मालकीची कंपनी सोहराय लाईव्ह स्टॉक प्रायव्हेट लिमिटेडला झारखंड सरकारने तब्बल 11.5 एकर जमीन देऊन टाकली. परंतु त्यातला घोटाळा बाहेर येताच ही जमीन 2020 मध्येच कंपनीने परत केल्याचा दावा करण्यात आला आहे.11.5 acres of land “gift” to Jharkhand Chief Minister’s wife’s meat company !! But the company claims to have returned the land to the government
हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन यांची सोहराय लाईव्ह स्टॉक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी मांस प्रक्रिया उद्योगात काम करते. सरकारने विजूबाडा औद्योगिक परिसरात कल्पना सोरेन यांच्या कंपनीला 11.5 एकर जमीन देऊन टाकली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या स्वतःकडेच उद्योग खाते असल्याने संबंधित जमीन कंपनीला दिल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी केला आहे.
मात्र हा आरोप होताच बिजूवाडा ज्या क्षेत्रात येते त्या जियाडा क्षेत्राचे विभागीय आयुक्त अजय कुमार यांनी संबंधित कंपनीने 2020 मध्येच आपल्याला मिळालेली जमीन सरकारकडे आधीच जमा करून टाकली आहे, असा खुलासा केला आहे.
मात्र या सगळ्या प्रकारात उद्योग खाते स्वतःकडे असलेल्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे. आधीच हेमंत सोरेन यांची बेनामी मालमत्ता संदर्भात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी सुरू केली आहे. त्यातच आता थेट पत्नीच्या नावाने असणाऱ्या या कंपनीला जमीन देण्याचा घोटाळा बाहेर आल्याने उद्योगमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी आपल्या निकटवर्तीय कोण कोणत्या उद्योगपतींना अथवा आमदारांना जमीन वाटप केले याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी रघुवर दास यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App