गुरूग्रामात महाराष्ट्र दिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन


विशेष प्रतिनिधी

चंदीगड : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सुगंध पुढील पिढीपर्यंत पोचावा या उद्देशाने ‘सार्वजनिक गणेशोत्सव समिती’, गुरूग्राम या हरियाणातील सांस्कृतिक संस्थेने १ मे २०२२, रविवार या दिवशी सायंकाळी ६ वाजता मुंबई आणि देशभरात ज्याचे २००० पेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत असा स्मृतिगंध जागृत करणारा उदय साटम प्रस्तुत ‘मराठी पाऊल पडते पुढे’, हा कार्यक्रम ठेवला आहे. Festival organized on the occasion of Maharashtra Day at Gurugram

हा कार्यक्रम ‘हुडा कम्युनिटी सेंटर, सेक्टर २७, गुरूग्राम’ येथील भव्य वातानुकूलित रंगायनात होणार आहे, ही महाराष्ट्राची लोकधारा अनुभवण्यासाठी साधारण ३०० मराठी लोक उपस्थित राहतील असा कयास आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय अर्थ-राज्यमंत्री, मा. डॉ. भागवत कराड आणि हरियाणाचे भाजप प्रभारी आणि महासचिव, मा. श्री विनोद तावडे यांनी संमती दिली आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते श्री हंसराज अहिर यांचे नेहमीप्रमाणे मार्गदर्शन लाभले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मनोज खरड आणि सचिव शांताराम उदागे यांनी दिली आहे.

करोनाच्या काळात हरियाणातील ३०० विद्यार्थ्यांना सह्याद्रीच्या कुशीत सुखरूप पोचवणाऱ्या श्रीकांत जाधव, आय पी एस, एडिजीपी, हरियाणा पोलीस आणि मकरंद खेतमळीस, आय ए एस, डायरेक्टर जनरल, टाऊन अँड कन्ट्री प्लॅनिंग, या मराठी योद्ध्यांच्या सन्मानाचा आणि कृतज्ञतेचा सोहळा देखील अगदी देखण्या आणि नेटक्या स्वरूपात यादिवशी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने सर्वोपरी सहकार्य केले आहे.

Festival organized on the occasion of Maharashtra Day at Gurugram

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था