CANARA to KASHI :कॅनडा ते काशी ; १०९ वर्षांची प्रतिक्षा-मोदी सरकारचा प्रयास-अन् अन्नपूर्णा मातेची घर वापसी; जाणून घ्या देवीच्या प्रवासाची संपूर्ण कहाणी…


  • १०९ वर्षांपूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती केंद्र सरकारच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर वाराणसीत आणली आहे.  गुरुवारी माता अन्नपूर्णाची मूर्ती कॅनडातून दिल्ली विमानतळावर पोहोचली. 
  • अन्नपूर्णा मातेची रथयात्रा दिल्ली येथून काढण्यात आली. ही रथयात्रा दिल्ली ते वाराणसीपर्यंत विविध जिल्ह्य़ांतून जाणार आहे .
  • १८व्या शतकातील ही मूर्ती १९१३ मध्ये काशीतील एका घाटावरून चोरीला गेली होती. त्यानंतर ती कॅनडाला नेण्यात आली होती.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या प्रयत्नांनी साधारण १०९ वर्षाआधी वाराणसी येथून चोरी केली गेलेली देवी अन्नपूणाची मूर्ती ( Maa Annapurna Idol) कॅनडाहून भारतात परत आणली गेली आहे. ही मूर्ती ११ नोव्हेंबरला उत्तर प्रदेश सरकारला सोपवण्यात जाईल. या मूर्तीत देवी अन्नपूर्णाच्या एका हातात खिरीची वाटी आणि दुसऱ्या हातात पळी आहे. 109 years of waiting – Modi government’s effort – Annapurna mother returns home

असं मानलं जात आहे की, १८व्या शतकातील ही मूर्ती १९१३ मध्ये काशीतील एका घाटावरून चोर गेली होती. त्यानंतर ती कॅनडाला नेण्यात आली होती.

पुन्हा काशीत स्थापन करणार मूर्ती

आई अन्नपूर्णेची ही मूर्ती कॅनडातील एका विश्वविद्यालयात ठेवली होती. ही मूर्ती परत आणण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होतं. आई अन्नपूर्णेची ही प्राचीन मूर्ती १५ नोव्हेंबरला काशी विश्वनाथ धामममध्ये पुन्हा स्थापन केली जाणार आहे. त्याआधी ४ दिवस ही मूर्ती १८ जिल्ह्यात दर्शनासाठी ठेवली जाईल.

१०९ वर्षापासून कॅनडात होती

गेल्यावर्षी  पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये ही मूर्ती भारतात परत आणण्याबाबत माहिती दिली होती. गेल्या १०९ वर्षापासून ही मूर्ती यूनिव्हर्सिटी ऑफ रेजिनाच्या मॅकेंजी आर्ट गॅलरीत होती.

हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा या गॅलरीत एक प्रदर्शनी सुरू होती. तेव्हा कलाकार दिव्या मेहराची नजर या मूर्तीवर पडली. त्यांनी हा मुद्दा उचलला आणि मग सरकारने ही मूर्ती परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

काय सांगतो इतिहास?

मॅकेन्झीने 1913 मध्ये भारताला भेट दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ही मूर्ती येथून कॅनडामध्ये पोहोचली. अन्नपूर्णा मातेने एका हातात खीर आणि दुसऱ्या हातात चमचा धरला आहे. ह्या मुर्तीचा मॅकेन्झीने 1936 वारसा देखील केला होता.

एका भारतीय कलाकाराची पडली नजर ….

भारतीय कलाकार दिव्या मेहरा यांना ही मुर्ती गॅलरीच्या कायमस्वरूपी संग्रहात सापडली. त्यानंतर दिव्याने मूर्तीला बेकायदेशीरपणे कॅनडामध्ये आणल्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाने पेट घेतला आणि जवळपास दोन वर्षांच्या प्रक्रियेनंतर आता मूर्ती भारतात आली आहे.

109 years of waiting – Modi government’s effort – Annapurna mother returns home

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात