प्रतिनिधी
अमरावती : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या विरोधात रझा अकादमीने अमरावतीत मोर्चा काढल्यानंतर आज त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अमरावती बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप दंगली घडवून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करत आहे. भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणायची आहे, असा आरोप केला आहे. अशाच आशयाचे विधान अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.Leave partisan politics calm Amravati
या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शांततेचे आवाहन केले आहे. त्याच वेळी त्यांनी संजय राऊत आणि यशोमती ठाकूर यांना राजकारण सोडून द्यायचे आणि अमरावतीकरांना शांत करायचे आवाहन केले आहे. ही वेळ कोणतेही धर्माचे, पक्षाचे राजकारण करायची नाही. पक्षीय राजकारण सोडून संजय राऊत, पालकमंत्र्यांनी जपून वक्तव्ये केली पाहिजेत. अमरावतीकरांना शांत केले पाहिजे. दोन्ही बाजूंना समजावून सांगितले पाहिजे, असे आवाहन केले आहे.
pic.twitter.com/6XfkMEXXbw — Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) (@navneetravirana) November 13, 2021
pic.twitter.com/6XfkMEXXbw
— Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) (@navneetravirana) November 13, 2021
काल अमरावतीत झालेल्या मोर्चातील दगडफेकीचा निषेध जरूर केला पाहिजे पण तो शांततेच्या मार्गाने असावा असे आवाहन देखील नवनीत राणा यांनी केले आहे याबाबत त्यांनी एक व्हिडिओ जारी करून अमरावतीकरांना देखील शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App