सिक्कीममधील पुरामध्ये 103 जण बेपत्ता, चुंगथांग शहर उद्ध्वस्त; 22,034 लोकांना पुराचा फटका


वृत्तसंस्था

गंगटोक : सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला. या पुरात १०३ लोक अजूनही बेपत्ता आहेत. यामध्ये लष्कराच्या १६ जवानांचा समावेश आहे. तिस्ता खोऱ्यात व उत्तर बंगालच्या खालच्या भागात पुरामुळे अनेक फूट उंच साचलेल्या चिखलात दुसऱ्या दिवशीही त्यांचा शोध गेतला जात आहे. ४१४ किमी लांबीची तिस्ता ही सीमापार नदी आहे. ती दक्षिणेकडे बर्फाच्छादित पूर्व हिमालयाने वेढलेल्या खोऱ्यांमधून वाहते आणि बांगलादेशातील ब्रह्मपुत्रला मिळते.103 missing in Sikkim floods, Chungthang town destroyed; 22,034 people affected by flood

सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसएसडीएमए) सांगितले की, आतापर्यंत २,०११ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. चार बाधित जिल्ह्यांमध्ये २६ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. दरम्यान, तिस्ता खोऱ्याच्या किनाऱ्यावर सापडलेली संभाव्य स्फोटके आणि दारूगोळ्यांबाबत राज्य सरकारने स्थानिक जनतेला सावध केले आहे. या दारूगोळ्यापासून दूर राहा. यामुळे स्फोट होऊ शकतो. अशी उपकरणे दिसल्यास तत्काळ माहिती द्या, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.हिमनदी २ किमी मागे गेली

संशोधनानुसार १९६२ ते २००८ या ४६ वर्षांत हिमनदी सुमारे २ किमी मागे गेल्याचे सांगण्यात आले. २००८ ते २०१९ पर्यंत ती सुमारे ४०० मीटरने मागे पडली. सिक्कीम हिमालयातील तिस्ता खोऱ्यातील उच्च उंचीच्या हिमनदी प्रदेशात ७३३ हिमनदी सरोवरे आहेत. संशोधनात आयआयटी रुरकी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, डेटन युनिव्हर्सिटी, अमेरिकेचे युनिव्हर्सिटी ऑफ ग्राझ यासह जगातील सहापेक्षा अधिक संस्थांचा समावेश आहे.

संशोधकांनी दिला होता इशारा

अवघ्या १० सेकंदांत १३,०० कोटींच्या तिस्ता-३ जलविद्युत प्रकल्पातील ६० मीटर उंच धरण पुरामुळे वाहून गेले. सिक्कीममधील दक्षिण सरोवर भविष्यात फुटून सखल भाग उद्ध्वस्त होऊ शकतो, असा इशारा संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने दोन वर्षांपूर्वी दिला होता. जिओमॉर्फोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, दक्षिण लोनाक सरोवरात गेल्या दशकांमध्ये हिमनदी वितळल्यामुळे लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या हिमनदी तलावात स्फोट होऊन पूर येण्याची शक्यता बळावली आहे.

103 missing in Sikkim floods, Chungthang town destroyed; 22,034 people affected by flood

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात