ब्रिटन सरकार करणार टाटाच्या” या” कंपनीत मोठी गुंतवणूक!


विशेष प्रतिनिधी

पुणे : जी 20 परिषदेनंतर जगाच्या नकाशावर भारताचं मोठं कौतुक झालं! भारत भारतीय अर्थव्यवस्था भारतीय व्यापार उद्योग या सगळ्यांकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. भारतीय उद्योग विश्वातला सगळ्यात मोठं नाव म्हणजे टाटा याच पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे. Britain government is ready to invest in Tata Group!

ब्रिटन सरकारने वेल्समधील टाटा स्टीलच्या स्टील प्लांटमध्ये 1.25 अब्ज पौंडांची संयुक्त गुंतवणूक योजना जाहीर केली आहे.ब्रिटनमधील सर्वात मोठ्या पोलाद कारखान्यात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली

ही गुंतवणूक योजना इतिहासातील सर्वात मोठे सरकारी अनुदान मानले जात आहे.टाटा स्टील प्लांटमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे अनुदान दिले आहे. कंपनीने 15 सप्टेंबर रोजी शेअर बाजाराला पाठवलेल्या पत्रव्यवहारात ही माहिती दिली.

टाटा समूहाची कंपनी टाटा स्टील आणि ब्रिटन सरकार यांच्यातील करारानुसार, पोर्ट टॅलबोट स्टील प्लांटमध्ये एकूण 1.25 अब्ज पौंडांची गुंतवणूक केली जाईल, ज्यामध्ये सरकारी अनुदानाचाही समावेश आहे.ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या गुंतवणुकीमुळे ब्रिटनच्या स्टील उद्योगाचे आधुनिकीकरण होईल. याशिवाय, हजारो कामगारांच्या रोजगाराचे संरक्षण होईल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत होईल.

Britain government is ready to invest in Tata Group!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात