प्रतिनिधी
पुणे : 2020 पासून सतत घोषणेच्या पातळीवर राहिलेले आयटीआय विद्यावेतन यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वाढले. ते 40 रुपयांवरून 500 रुपयांवर नेले आहे. तब्बल 40 वर्षानंतर रकमेत बदल झाला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना काढली आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वेगवेगळ्या रोजगार मेळाव्यांमध्ये या संदर्भातल्या घोषणा केल्या होत्या. परंतु, त्या प्रत्यक्षात यायला अनेक महिन्यांचा कालावधी जावा लागला. 40 years long wait of ITI students is over
आयआयटी विद्यावेतन योजना 1983 मध्ये सुरू झाली. पण त्यातल्या रकमेची वाढ अतिशय कुर्मगतीने झाली. त्यासाठी 12 ते 15 सरकारे येऊन जावी लागले. पण आता आयटीआय मध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या (सन 2023 – 24) या शैक्षणिक वर्षांपासून दरमहा 500 रुपये विद्यावेतन (स्टायपेंड) देण्यात येणार आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील साधारण 25000 विद्यार्थ्यांना होणार आहे.
दुर्बल घटकांना विद्यावेतन
आयटीआयमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने आर्थिक दुर्बल घटकांसह, ग्रामीण भागातील असतात. सध्या आयटीआय मधील विद्यार्थ्यांना 40 रुपये, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना 60 रुपये विद्यावेतन मिळत होते. त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू होती. काही महिन्यांपूर्वी कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वाढीव विद्यावेतनाची घोषणा केली होती. आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना हमखास नोकरी मिळू शकते.त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे असतो. अनेक आयटीआय मध्ये वसतिगृहांची सुविधा असल्याने दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आर्थिक मदतीच्या दृष्टीने विद्यावेतनाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.
बँकखात्यात जमा होईल विद्यावेतन
सरकारी आयटीआय मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षांपासून 500 रुपये विद्यावेतन मिळेल. उत्पन्नाचे निकषासह, प्रवेश अर्जासोबत बँक खाते क्रमांक घेण्यात येईल. शासकीय निकषांच्या आधारे थेट बँक खात्यामध्ये विद्यावेतन जमा होईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना आयटीआय मध्ये कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more