तुमचे प्रकाश आंबेडकर तर आमचे जोगेंद्र कवाडे; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची राजकीय सलगी वाढत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील स्वस्थ बसलेले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार जोगेंद्र कवाडे आणि त्यांचे पुत्र जयदीप कवाडे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन उद्धव ठाकरेंना राजकीय प्रत्युत्तर दिले आहे.Jogendra kawade and his son jaideep kawade meets CM eknath shinde

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी राजकीय युती करणार असेल, तर बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष देखील दलित राजकारणाच्या दृष्टीने दुसऱ्या गटाला आकर्षित करू शकतो, असेच एकनाथ शिंदे यांनी कवाडे पिता-पुत्रांच्या भेटीने दाखवून दिले आहे.उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीचा फार मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होईल, अशी चर्चा मराठी प्रसार माध्यमांनी चालविली आहे. या वाढत्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे आणि जयदीप कवाडे या पिता पुत्रांना वर्षा निवासस्थानावर भेटून त्या चर्चेला आणि ठाकरे – आंबेडकर संभाव्य युतीला काटशह दिल्याचे मानले जात आहे.

हेच ते जोगेंद्र कवाडे आहेत, ज्यांनी 1998 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर रिपब्लिकन ऐक्य घडवून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या अखंड काँग्रेसशी संधान बांधून चिमूर मधून खासदारकीची निवडणूक जिंकली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि रा. सू. गवई हे 4 रिपब्लिकन नेते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अखंड काँग्रेसच्या पाठिंब्याने लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र 1999 मध्ये पवारांचा हा प्रयोग फारसा चालला नाही आणि पुन्हा एकदा हे चारही नेते वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षांमध्ये विखुरले गेले.

आता प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय सलगी वाढवली आहे, तर त्या राजकीय सलगीला काटशह देत एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडे एकत्र येण्याची चिन्हे आहेत. जोगेंद्र कवाडे यांचा विदर्भाच्या राजकीय प्रवाहात असलेल्या प्रभाव शिंदे गटाला उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.

Jogendra kawade and his son jaideep kawade meets CM eknath shinde

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण