आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचे तुम्हाला निमंत्रण दिले नाही, खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना सुनावले


विशेष प्रतिनिधी

अमरावती : शिवसेनेचे खासदार संजय राऊत अमरावतीबद्दल बोलत आहेत. ते कोणत्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. माझ्या अमरावतीच्या लोकांबद्दल तुम्ही कशी प्रतिक्रिया देत आहात? आम्ही आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचं तम्हाला निमंत्रण दिल नाही. तुम्ही तुमचं काम करा जे तुम्हाला बरोबर येत नाही, ते आधी शिकून घ्या, अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे.You have not been invited to speak about our district, MP Navneet Rana told Sanjay Raut

अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली. यावेळी राज्यसरकारवर टीका करताना राणा म्हणाल्या, अमरावतीतील हिंसाचार यंत्रणेचे अपयश आहे. आमच्या अमरावती जिल्ह्यात असं कधीही घडल नाही. पहिल्यांदा अशी घटना घडली. त्यामुळे मला खूप दु:ख वाटत आहे. या हिंसाचारात जे जखमी झाले तसेच ज्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारने भरपाई द्यावी. यामध्ये काही राजकीय लोक आपले हात धूऊन घेत आहेत.देशातील बाकी राज्याचं आमच्या जिल्ह्याशी काय घेण-देण आहे. ही घटना हाताळण्यात तुम्ही अपयशी ठरले आहात अशी टीका राणा यांनी राज्य सरकारवर केली.अमरावती शहरात शनिवारी सलग दुसºया दिवशी दगडफेक, जाळपोळ झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

भाजपाने पुकारलेल्या बंददरम्यान समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलिसांसह नऊ जखमी झाले. शहरातील काही धार्मिक स्थळांसमोर नासधूस करण्यात आल्याने वातावरण चिघळले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. दरम्यान, प्रशासनाने ४ दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे. अफवा पसरवण्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आली.

अमरावती शहराच्या पश्चिमेकडील नमुना, सराफा बाजार, सक्करसाथ या भागांत दोन गट समारोसमोर आल्याने काही काळ बिकट स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

त्रिपुरा येथील घटनांच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लीम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी काही समाजकंटकांनी दुकानांवर दगडफेक केली. तसेच काहींना मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ भाजपाने शनिवारी अमरावती बंदचे आवाहन केले होते. शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर भागांतून बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

भाजपाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राजकमल चौकात जमले होते. तेथे कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. काही वेळानंतर भाजपाचे आंदोलक कार्यकर्ते ऑटोगल्ली, अंबापेठ परिसरात शिरले. घोषणाबाजी करीत त्यांनी बंद दुकानांवर दगडफेक केली. अंबापेठ येथील एका रुग्णालयावरही दगडफेक करण्यात आली.

You have not been invited to speak about our district, MP Navneet Rana told Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती