प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहेत. याच मुद्द्यावरून देशभरातून राहुल गांधींचा निषेध होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही म्हणता मी सावरकर नाही गांधी आहे पण वीर सावरकर होण्याची तुमची लायकीही नाही, अशा तिखट शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर पत्रकार परिषदेत शरसंधान साधले आहे.You do not deserve to be Veer Savarkar; Chief Minister Eknath Shinde’s sharp attack on Rahul Gandhi
मुख्यमंत्री शिंदे नक्की काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहुल गांधींविरोधात निषेध व्यक्त करताना म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहेत. त्याचा निषेध करावा तो थोडाच आहे. पण मी त्यांचा जाहीर निषेध, धिक्कार करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यामुळे खऱ्या अर्थाने या देशभक्तांच्या त्यागातून हे आपल्याला स्वातंत्र्य मिळाला आहे. त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण उपभोग सर्वजण घेतोय. राहुल गांधी ही त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताहेत. या देशामध्ये लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने वावरण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार देखील मिळाला. परंतु खऱ्या अर्थाने ज्या देशभक्ताने आणि स्वातंत्र्यसैनिकांनी जो त्याग केला, बलिदान दिलं आणि हे स्वातंत्र्य मिळवलं. त्यांचा जाणीवपूर्वक वारंवार अवमान, अपमान करण्याचा जो निंदनीय प्रकार केला जातो. त्याचा निषेध संपूर्ण राज्यातच नाही, तर देशभरात होतोय. खरं म्हणजे जे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय आणि राहुल गांधीही उपभोगतायत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या सेल्युलर जेलमध्ये मरण यातना झेलल्यात तिथे राहुल गांधी यांनी एक दिवस राहून यावं, मग त्यांना त्यांची जाणीव येईल. पण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? म्हणून त्यांच्या कृत्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खऱ्या अर्थाने निषेध हा सगळ्यांनी केला पाहिजे होता. परंतु ज्यांनी त्यांचा अवमान केला ते वारंवार सांगतायत मी वीर सावरकर नाही, गांधी आहे. वीर सावरकर होण्याची तुमची लायकी देखील नाहीये. वीर सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाहीये. तुम्ही काय वीर सावरकर होऊ शकता? वीर सावरकर होण्यासाठी तेवढा त्याग, या देशाबद्दलचं प्रेम हे तुमच्यामध्ये असायला पाहिजे. पण तुम्ही तर या देशाची निंदा परदेशात जाऊन करताय. याच्यापेक्षा जास्तीच दुर्दैव काय असू शकतं या देशाचं? देशाच्या लोकशाहीबद्दल बोलताय, पंतप्रधान मोदींबाबत बोलताय. परदेशात जाऊ ज्याप्रमाणे देशाची निंदा करताय हे खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त महाराष्ट्राचे दैवत नसून संपूर्ण देशाचे दैवत आहेत.
मालेगावच्या सभेत राहुल गांधींना सावरकरांचा अपमान करू नका म्हणणारे प्रत्यक्ष काँग्रेस पासून दूर होण्याची हिंमत दाखवणार आहेत का??, असा बोचरा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. व्याज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App