विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभेतले निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेल्या अपमानाचा विषय देशभरात प्रचंड तापला असून महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.Rahul Gandhi protests; Shiv Sena – BJP to take out Savarkar Gaurav Yatra across Maharashtra!!; Announcement of Chief Minister – Deputy Chief Minister
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना – भाजप युतीने राहुल गांधींचा तीव्र निषेध करत संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथी गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली. देशातल्या संपूर्ण मोदी समाजाला चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार त्यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी माझे नाव सावरकर नाही. माझे नाव गांधी आहे आणि गांधी कधी माफी मागत नसतात, असे उद्गार काढले होते. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कथित माफीनाम्याविषयी त्यांनी वारंवार असे गैरउद्गार काढून त्यांचा अपमान केला आहे. याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत तीव्र निषेध केला.
त्याचवेळी दोन्ही नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील शरसंधान साधले. उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. आजच्या सामनाच्या अग्रलेखात याच इशाऱ्याची त्यांनी पुनरावृत्ती केली होती. परंतु, प्रत्यक्षात कृती करण्याचे आव्हान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरला बाळासाहेब ठाकरे यांनी जोड्याने मारले होते. उद्धव ठाकरे राहुल गांधींना जोड्याने मारण्याची तशी हिंमत करतील का??, असा बोचरा सवाल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. बाळासाहेब आज असते तर सावरकरांचा अपमान करणाऱ्याला त्यांनी जोड्याने मारलेच असते पण अपमान सहन करणाऱ्यालाही जोड्या हाणले असते, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
संपूर्ण महाराष्ट्रभर सावरकर गौरव यात्रा काढून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग, त्यांचे सामाजिक राजकीय कार्य याची माहिती देण्याचे काम महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपचे आमदार नेते कार्यकर्ते करतील, अशी माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App