धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर करण्यास उत्तर प्रदेशात बंदी, योगी आदित्यनाथ यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश


धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशात रस्त्यांवर कुठलेही धार्मिक करता येणार नाहीत. रस्त्यांवर कोणतेही धार्मिक कार्यक्रम घेण्यास कोणतीही परवानगी देऊ नका. अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम हे संबंधित धार्मिक स्थळांमध्येच व्हायला हेवत, रस्त्यावर नाही, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. Yogi Adityanath orders authorities to ban religious activities on roads in Uttar Pradesh


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशात रस्त्यांवर कुठलेही धार्मिक करता येणार नाहीत. रस्त्यांवर कोणतेही धार्मिक कार्यक्रम घेण्यास कोणतीही परवानगी देऊ नका. अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम हे संबंधित धार्मिक स्थळांमध्येच व्हायला हेवत, रस्त्यावर नाही, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरील एक लाखांवर भोंगे उतरवले आहेत. काढून टाकलेले लाऊडस्पीकर पुन्हा लावले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. काढलेले भोंगे पुन्हा लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. धार्मिक कार्यक्रम धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असावेत, रस्त्यावर कोणताही उत्सव आयोजित करू नये आणि या कार्यक्रमांमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


YOGI ADITYANATH:हिंदूचं घर जळणार तेव्हा मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहणार : योगी आदित्यनाथ


उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याची आणि इतर लाऊडस्पीकरचा आवाज विहित मयार्देपर्यंत मर्यादित करण्याची मोहीम २५ एप्रिलपासून सुरू झाली होती आणि ती १ मेपर्यंत चालली होती. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी लखनऊ येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, सर्व धार्मिक स्थळांवरून बेकायदेशीरपणे लावलेले लाऊडस्पीकर कोणताही भेदभाव न करता काढले जात आहेत आणि असे सर्व लाऊडस्पीकर बेकायदेशीर श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. परवानगी नसलेलेच लाऊडस्पीकर काढण्यात येत असून लाऊडस्पीकरबाबतच्या कारवाईदरम्यान उच्च न्यायालयाचे आदेशही लक्षात ठेवले जात असल्याचेही कुमार म्हणाले होते.

Yogi Adityanath orders authorities to ban religious activities on roads in Uttar Pradesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात