यशोमती ठाकूर अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यावर भडकल्या, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयातून पोलीसांवर दबावाचा आरोप


विशेष प्रतिनिधी

अमरावती : महिला आणि बालविकास मंत्री आणि कॉँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर चांगल्याच भडकल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयामध्ये बसून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. या कार्यालयांचा पुरेपूर वापर केला जात आहे. त्या कार्यालयाच्या दुरुपयोगामध्ये पोलिसांचा देखील वापर होत असतो, असा आरोप ठाकूर यांनी केला आहे.Yashomati Thakur lashes out at Ajit Pawar and Dilip Walse-Patil, accuses Deputy Chief Minister and Home Minister of pressuring police

अमरावतीच्या जिल्हा बँक निवडणुकीनंतर विजयाचा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबले आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. त्यामुळे ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे.त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी स्वत: गाडगेनगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस स्टेशनला घेराव केला आणि गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्यावर कारवाईची मागणी करत कार्यकर्त्यांवर कोणाच्या दबावापोटी गुन्हे दाखल करत असाल तर खबरदार हे खपवून घेतले जाणार नाही,असे संजय खोडके यांचे नाव घेता सांगितले.

गृहमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयातून पोलिसांवर दबाव निर्माण करून याचा दुरुपयोग करून कार्यकर्त्यांना डांबले जात आहे आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ती मी हाणून पाडली असंही यशोमती ठाकूर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की,त्यांनी 10 जणांची यादी तयार केली होती.

इथला जो पीआयए चोरमुले आहे, ते खूप बदनाम आणि त्यांची अनेक वादग्रस्त प्रकरण आहे. तो चोरी आणि वसुल्या करत असतो. पण, एवढा घमंड दाखवतो, त्याचा आम्ही निषेध करतो. यापुढे अशी दादागिरी सहन करणार नाही.या प्रकारानंतर यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार केली आहे. बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करणार असल्याचेही सांगितले.

Yashomati Thakur lashes out at Ajit Pawar and Dilip Walse-Patil, accuses Deputy Chief Minister and Home Minister of pressuring police

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण