भारतच नव्हे, तर अख्ख्या जगात हॉस्पिटल बेडची टंचाई; सर्वात टॉपच्या जपानमध्येही हजार लोकांवर फक्त १३ बेड, वाचा सविस्तर..


Per Capita Bed Availability : कोरोना महामारीने अवघ्या जगाला विळखा घातलाय. या महासंकटाच्या काळात सर्वात मोठी अडचण रुग्णालयात बेड मिळण्याची आहे. भारतात तर सध्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. आतापर्यंतची सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या भारतात आहे. यामुळे बेडसाठी अनेकांची मोठी वणवण सुरू आहे. बेड‌्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या वैद्यकीय सुविधांचा मोठा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. यामुळे जागतिक स्तरावर प्रमुख देशांमध्ये लोकसंख्येनिहाय बेडची संख्या किती, हे जाणून घेणे योग्य ठरेल. एका अहवालानुसार, जपान आणि दक्षिण कोरिया हे देश याबाबत टॉप-२ मध्ये आहेत. World Bank Data Shows Hospital Facility around the world, Know Per Capita Bed Availability of All countries


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना महामारीने अवघ्या जगाला विळखा घातलाय. या महासंकटाच्या काळात सर्वात मोठी अडचण रुग्णालयात बेड मिळण्याची आहे. भारतात तर सध्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. आतापर्यंतची सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या भारतात आहे. यामुळे बेडसाठी अनेकांची मोठी वणवण सुरू आहे. बेड‌्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या वैद्यकीय सुविधांचा मोठा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. यामुळे जागतिक स्तरावर प्रमुख देशांमध्ये लोकसंख्येनिहाय बेडची संख्या किती, हे जाणून घेणे योग्य ठरेल. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, जपान आणि दक्षिण कोरिया हे देश याबाबत टॉप-२ मध्ये आहेत.

जपानमध्ये प्रति हजार लोकांवर 13 बेड

कोरोना महामारीने जेवढी दुर्दशा केली तेवढे शिकवलेही. देशातील पायाभूत आरोग्य सुविधा उभारण्याकडे सर्वच देशांचे लक्ष गेले. वर्ल्ड बँकेच्या डाटानुसार, जपानमधील एक हजार लोकांवर रुग्णालयात 13 बेड उपलब्ध आहेत. तर दक्षिण कोरियामध्ये 12.5 आणि जर्मनीमध्ये 8 आहेत. हे तीन देश पहिल्या क्रमांकावर आहेत. याबाबत महाशक्ती रशिया चौथ्या, फ्रान्स पाचव्या आणि अमेरिका सहाव्या स्थानावर आहे. रशियात प्रति हजार लोकांवर सात बेड उपलब्ध आहेत, फ्रान्समध्ये सहा आणि पण अमेरिकेत फक्त तीन आहेत.

वर्ल्ड बँकेच्या या अहवालाचे आधार वर्ष 2018 आहे. तथापि, गेल्या दोन वर्षांत या सर्व देशांमधील रुग्णालयांची संख्या व सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. परंतु या महामारीने महासत्ता काय किंवा विकसित अथवा विकसनशील देश काय, या सर्वांनाच संकटातून जावे लागले आहे.

ब्रिटनमध्ये 2.5, तर भारतात फक्त अर्धा बेड

विकसित म्हणवला जाणारा ब्रिटनही खालच्या क्रमांकावर आहे. ब्रिटनमध्ये प्रति 1000 लोकसंख्येवर 2.5 बेड उपलब्ध आहेत. भारतात हा दर अवघा 0.5 टक्के आहे. म्हणजेच भारतात दर एक हजार लोकांना फक्त अर्धा बेडच पुरविला जाऊ शकतो. अर्थात हा आकडा 2018 चा आहे. महामारीची सुरुवात झाल्यानंतर देशात अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ सुरू आहे. आधी सरकारी रुग्णालयांत होणारे उपचार नंतर जागा कमी पडतेय म्हणून जंबो कोविड सेंटरपर्यंत पोहोचले आहेत. एवढेच नाही, तर भारत सरकारने रेल्वेचे बेड्सही या कामी घेतले आहेत. यामुळे वरील आकडेवारीत नक्कीच बदल झालेला असणार, हे मात्र नक्की.

परिस्थिती बदलतेय, पण अजून बराच पल्ला गाठायचाय

देशात आयुष्मान भारत योजनेनंतर परिस्थिती हळूहळू सुधारत आहे, परंतु अद्याप ती अपुरी आहे. देशातील आरोग्य यंत्रणा साथीच्या आजाराचा भार सहन करण्यास सक्षम नाही. म्हणूनच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लाखो रुग्ण दररोज आढळत असताना त्यांना बेड व इतर वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवत आहे. महामारीच्या प्रारंभानंतर केंद्र सरकार व राज्य सरकारांनी मिळून यावर उपाययोजना केली आहे. अनेक नवीन रुग्णालये, बेडची उपलब्धता करतानाच ऑक्सिजन व जीवनावश्यक औषधांच्या पुरवठ्याची व्यवस्था केली. परंतु याच वेळी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कुठून आणणार. तुम्ही वस्तू भराभर तयार करू शकता, मागवूही शकता; पण तज्ज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी कुठून आणणार? त्यांची संख्या तर तेवढीच राहील ना? यामुळेच आरोग्य यंत्रणेवर ताण असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. अनेक कोविड योद्धे सलग 15 -15 तास पीपीई किट घालून रुग्णांची देखभाल करताना दिसत आहेत. या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी देशात ऐतिहासिक लसीकरण सुरू आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येला लस द्यायची म्हटल्यावर उत्पादन ते वितरण असा अजून काही कालावधी लागणार आहे. यानंतरच कोरोनावर मात करणे भारताला शक्य होणार आहे.

वर्ल्ड बँकेचा डेटा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

World Bank Data Shows Hospital Facility around the world, Know Per Capita Bed Availability of All countries

World Bank Data Shows Hospital Facility around the world, Know Per Capita Bed Availability of All countries

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात