पुण्यात झोपडपट्टीत जाऊन लसीकरण करणार; ऑनलाइन नोंदणी अभावी प्रशासनाचा निर्णय


वृत्तसंस्था

पुणे : कोरोनाविरोधी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. अनेक नागरिकांकडे मोबाईल, लॅपटॉप आदी आधुनिक यंत्रणा नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुण्यातील झोपडपट्ट्यात जाऊन नागरिकांना कोरोना विरोधी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत ३९० झोपड्यातील सुमारे १० लाख जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. Will go to slums in Pune and vaccination the people ; Administration’s Taken Decision

सुमारे चार लाख जणांना फायदा

शहरातील ३९० झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे १० लाख नागरिक राहतात. त्यातील ४० टक्के लोकसंख्या ही १८ ते ४४ वयोगटातील आहे. सरकारकडून पुरेसा लस पुरवठा झाला तर महापालिकेची योजना यशस्वी होऊन सुमारे चार लाख नागरिकांना फायदा होईल.

१८ ते ४४ वयोगटाचे १०० टक्के आॅनलाइन लसीकरण केले जात आहे. झोपडपट्टीतील नागरिक वंचित रहात आहेत. त्यासाठी३९० झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन लसीकरणाचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी समाजमंदिर व इतर ठिकाणाचा उपयोग केला जाईल.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

झोपडपट्टीतील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे महापालिका अशी योजना राबवत असेल तर नक्कीच फायदा होईल. मेट्रो व इतर प्रकल्पांसाठी झोपडपट्टीतील नागरिकांचे इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे, त्यांच्यासाठीही लसीकरण झाले पाहिजे.
– विकी क्षीरसागर, मुंढवा, नागरिक

Will go to slums in Pune and vaccination the people ; Administration’s Taken Decision

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात