विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फार कमी वेळा बाहेर पडतात त्यातच आता मणक्याचा आजार असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाही. When the Chief Minister is not in the chair, the state should start properly
शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही, शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात, रावसाहेब दानवेंचा टोला
यावर रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य व्यवस्थित सुरुये, याचं श्रेय राज्यपालांना जाते, राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
रावसाहेब दानवेंचा दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद …
मुख्यमंत्री खुर्चीवर नाहीत तरी राज्य व्यवस्थित सुरू आहे. खरं तर आताच राज्य व्यवस्थित सुरू आहे. त्याचं कारण आहे की राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. आता मुख्यमंत्री या राज्याचा खुर्चीवर नसताना राज्य चांगलं चाललं तर याचं श्रेय राज्यपालांना व या राज्यातील शांतता, संयमी आणि सहनशील जनतेला जातं. सरकारला मुळीच नाही…असं ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App