पुणे तिथे काय उणे ! देशाची पहिली हायड्रोजनवर चालणारी बस विकसित

अशा १००० बसेस जरी रस्त्यावर आल्या तरी आजच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि स्वच्छ दळणवळणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. What is missing in Pune! Developed the country’s first hydrogen-powered bus


विशेष प्रतिनिधी

पुणे : स्वच्छ इंधनाचा पर्याय म्हणून हायड्रोजन इंधन घटाकडे पाहिले जात असून, जगभरात यावर संशोधन आणि प्रयोग चालू आहे.दरम्यान देशाची पहिली हायड्रोजनवर चालणारी पूर्णतः स्वदेशी बनावटीची बस पुण्यात विकसित करण्यात आली आहे.राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आणि केंद्रीय विद्युत रासायनिक संशोधन संस्था सहकार्याने केपीआयटीच्या सेंटीयंट लॅबने ही बस विकसित केली आहे.हिंजेवाडी येथील सेंटीयंट लॅबच्या कार्यशाळेत तिचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमात सहा चाकी ३२ आसनांची बस माध्यमांसमोर चालविण्यात आली.अनावरण प्रसंगी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, लॅबचे अध्यक्ष रवी पंडित आदी उपस्थित होते.अशा १००० बसेस जरी रस्त्यावर आल्या तरी आजच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि स्वच्छ दळणवळणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.



डॉ. माशेलकर म्हणाले,”मेक इन इंडिया म्हणजे परदेशातील आयात संयंत्रे भारतात आणून जोडणे नव्हे. तर इथे संशोधन करून प्रत्यक्ष नवीन तंत्रज्ञान विकसित करणे होय.भविष्यकालीन इंधनाचा मोठा स्रोत असलेल्या हायड्रोजन इंधनात भारताला मोठी प्रगती करण्याची क्षमता आहे. यासाठी उद्योग, संशोधन संस्थांबरोबरच प्रशासकीय धोरणांचा समन्वय आवश्यक आहे.”

पूढे लॅबचे अध्यक्ष रवी पंडित म्हणाले की , दूरच्या अंतरासाठी विकसित केलेली कदाचित हे जगातील पहिलेच संशोधन आहे. यासाठी लागणारे सर्वच्या सर्व संयंत्रे पुणे आणि बंगळूर येथील प्रयोगशाळांमध्ये विकसित करण्यात आले आहे. त्याचबरोबर हायड्रोजन इंधनाचे नवे पर्याय आणि विद्युत घटाच्या साठवणूक संदर्भातील नवे संशोधन आम्ही लवकरच घोषित करणार आहोत, असे पंडित यांनी सांगितले.

बसची वैशिष्ट्ये

  • १)इलेक्ट्रॉनिक्स आणि यांत्रिकी संयंत्रांची देशातच निर्मिती
  • २)संपूर्ण यंत्रणा बसच्या वरच्या भागात, त्यामुळे सुरक्षितता अधिक
  • ३)सहाशे किलोमीटर धावण्याची क्षमता
  • ४)एक किलो हायड्रोजनमध्ये २० किलोमीटर धावते

What is missing in Pune! Developed the country’s first hydrogen-powered bus

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात