Weather Alert : राज्यात 6 जुलैपासून दमदार पाऊस, मराठवाड्यात तीन दिवस मध्यम पावसाचा इशारा


वृत्तसंस्था

मुंबई : शनिवारी संपूर्ण देशात मान्सूनचा विस्तार झाला. जुलै महिन्यात देशात सरासरीएवढा तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक (45 टक्के) पावसाचा अंदाज आहे. 6 जुलैपासून राज्यात दमदार पाऊस होण्याचे भाकीत वेधशाळेने वर्तवले आहे.Weather Alert Heavy rains in the state from July 6, three days of moderate rains in Marathwada

मराठवाड्यात 3, 4 व 5 जुलै रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.मराठवाड्यात 3 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस

मराठवाड्यात 3, 4 व 5 जुलै रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. 3 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात, 4 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट होईल.

5 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात 8 ते 14 जुलैदरम्यान, पाऊस सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Weather Alert Heavy rains in the state from July 6, three days of moderate rains in Marathwada

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती