शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याया विरुद्ध हा बंद कडकडीत पाळला जाईल : नवाब मलिक


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र मध्ये बंद पुकारला आहे. मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीमध्ये याविषयी खेद व्यक्त करण्यात आला आणि शेतकर्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ  उद्या महाराष्ट्र बंद करण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला होता.

We seek justice : nawab malik

या हिंसाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीदेखील आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा बंद कडकडीत राहणार असल्याचे सांगत जनतेला या बंदला स्वत:हून पाठिंबा देण्याचे आणि या बंदमध्ये सहभागी होऊन पीडितांसोबत उभे राहण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे.

शेतकरीविरोधी कृषी कायदे करून केंद्र सरकार जुलमी कारभार करत आहे आणि त्यामुळे शेतकर्यांच्या हत्या केल्या जात आहेत. या विरोधात जनता या बंदला नक्कीच साथ देईल असा विश्वास मलिक यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


Nawab Malik vs Fadanvis:नवाब मलिकांनी घेतली आर्यनची बाजु तर फडणवीस म्हणतात…NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे …


या हत्येमागे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा हात असल्याचे जनतेने दाखवून दिले. तरी त्यावर अजून कारवाई होत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गावात ही घटना घडली आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील मलिक यांनी या वेळी केली आहे.

लखीमपूर खेरी येथील पीडित कुटुंबाला तसेच शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे आहोत हे दाखवून देण्यासाठी या बंदला तुम्ही पाठींबा दिला पाहिजे आणि सहभागी झाले पाहिजे असेदेखील नवाब मलिक यावेळी म्हणाले आहेत.

We seek justice : nawab malik

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर