पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, दुरुस्तीचा कामामुळे पाणीपुरवठा काही भागात राहणार बंद; जपून वापरण्याचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

पुणे : देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (ता. ९) पुण्यातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
Water supply in Pune will be cut off in some areas on Thursday due to repair work; Appeal to use carefully

वडगाव आणि लष्कर जलकेंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे होणार आहेत. त्यामुळे गुरुवारी पुणेकरांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ होण्याची शक्यता आहे. पुणेकरांनी गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारपर्यंत पाणी जपून वापरावे, असा सल्ला देण्यात आला आहे. शुक्रवारी १० डिसेंबर रोजी दुपारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दीड दिवस पाणी जपून वापरावे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग: वडगाव जलकेंद्र हद्दीतील सिंहगड रस्ता, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर आणि कोंढवा बुद्रुक याठिकाणी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याव्यतिरिक्त लष्कर जलकेंद्राच्या हद्दीतील हडपसर, काळेपडळ, महंमदवाडी, सय्यदनगर, गोंधळेनगर, बी टी कवडे रस्ता, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी आणि साडेसतरानळी परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी १० डिसेंबर रोजी दुपारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

Water supply in Pune will be cut off in some areas on Thursday

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती