नाशिक : येवला मुक्तीभूमी ; शासनाकडून मिळाला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा


  • बाबासाहेबांचा वारसा जपण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने देशभरातील अनुयायांना ही विशेष भेट दिली आहे. Nashik: Yeola Muktibhoomi; The status of ‘B’ class pilgrimage site received from the government

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली, ती येवला मुक्तीभूमी आहे.येवला शहर हे नाशिक-निफाड- औरंगाबाद रस्त्यावरील एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. या ठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मातराची घोषणा केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘येवला मुक्तीभूमी’ या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.



बाबासाहेबांचा वारसा जपण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने देशभरातील अनुयायांना ही विशेष भेट दिली आहे.ऐतिहासिक महत्व असलेल्या येवला मुक्तीभूमीला ‘ब; वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी भुजबळ हे पाठपुरावा करीत होते. हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. या प्रस्तावास मंजुरी मिळून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ही जागा मुक्तीभूमीकरीता आरक्षित आहे. या मुक्तीभूमीचा विकास सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्ती पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून केली जाते.

Nashik : Yeola Muktibhoomi; The status of ‘B’ class pilgrimage site received from the government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात