Watch Shivsena Leader MP Sanjay Raut comment On Maratha Reservation Agitation in Kolhapur

WATCH : कोल्हापुरातील मराठा आंदोलनाबाबत संजय राऊत काय म्हणाले?

Maratha Reservation : कोल्हापुरात आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे. कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात जी आंदोलनाची सुरुवात झाली आहे त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या सर्वच घटकांची सहानुभूती आणि पाठिंबा आहे. राऊत पुढे म्हणाले, ह्या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना साकडे घातले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मांडली आहे. सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याने हे सर्व शांतपणे आणि सुरळीत पार पडेल आणि केंद्र सरकार या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढेल, अशी आम्हाला खात्री आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंबाबत बोलताना ते म्हणाले की, दानवेंकडे ही चावी होती म्हणून दीड वर्षापूर्वी तुमच्या सत्तेला टाळ लागलं आणि आमचं टाळ उघडलं. ज्याच्याकडे चावी आहे आणि टाळ आहे ते कोणालाही टाळे लावू शकतात. आमच्याकडे चाबी आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही उघडू. Watch Shivsena Leader MP Sanjay Raut comment On Maratha Reservation Agitation in Kolhapur

महत्त्वाच्या बातम्या