WATCH : करमाळ्याचे आ. संजय शिंदेंवर १५०० शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज काढल्याचा आरोप

Watch MLA Sanjay Shinde accused For Fraud Of Farmers Bogus Loan, Farmers Protest in Pune

MLA Sanjay Shinde : करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढल्याचा आरोप आहे. याविषयी बँकेने कारवाई नाही केली तर अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा अतुल खुपसे यांनी दिला आहे. पंजाब बँकेवर आज करमाळ्यामधील शेतकऱ्यांनी आक्रमक होत भीक मागत अर्धनग्न आंदोलन केले. जर आमदार संजय शिंदेंवर कारवाई झाली नाही, तर ईडी कार्यलायवर उपोषण करण्याचा इशारा अतुल खूपसे यांनी दिला आहे. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलल्याचा प्रकार समोर आलाय. शिवाय काढलेली कर्ज वेळेत न भरल्याने ती कर्ज भरण्यासंदर्भात पुण्यातील कोथरूडमधील पंजाब नॅशनल बँकेने वकिलामार्फत नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात न्याय न मिळाल्याने आज पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेच्या कॅम्पमधील विभागीय कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. बँक मॅनेजर कुठलंही उत्तर न देता निघून गेले. रस्त्यावर मागितलेली भीक बँकेला व संजय शिंदेंना देण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याकडून २०१३ मध्ये खत देतो म्हणून, आधार कार्ड, मतदान कार्ड तसेच सातबारा उतारा आणि अनेक ठिकाणी सह्या घेण्यात आल्या. मात्र, संबंधित शेतकऱ्यांना खत मिळाले नाही. २०१३ पासून आतापर्यंत कारखाना आणि बँकेची कोणतीही नोटीस कर्ज भरण्यासंदर्भात आली नाही. मात्र, २९ मेनंतर पंजाब नॅशनल बँकेच्या वकिलांकडून पोस्टाने नोटीस पाठवून कर्जाची रक्कम २ मेपर्यंत भरावी अन्यथा फौजदारी कारवाई करावी लागेल, असा इशारा वकिलामार्फत पाठविलेल्या नोटिशीत देण्यात आला आहे. यावर आमदार संजय शिंदेंची प्रतिक्रया अद्याप समजू शकलेली नाही. Watch MLA Sanjay Shinde accused For Fraud Of Farmers Bogus Loan, Farmers Protest in Pune

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात