मनसुख हिरेन हत्येप्रकरणी तपास करत असलेल्या NIA ने एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी छापे टाकले. प्रदीप शर्मांची यात नेमकी काय भूमिका आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तथापि, विरोधकांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, अटकेत असलेल्या सचिन वाझेंच्या मागे प्रदीप शर्मा असल्याचं सर्वश्रुत होतं. त्यांच्या चौकशीतून अनेक गुपितं समोर येण्याची शक्यता आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांवर कारवाई होईल. त्यांच्यापर्यंत संशयाची सुई पोहचणे अपेक्षितच होते. दोन्ही प्रकरणांत प्रदीप शर्मा यांचा काय रोल आहे, हे समोर आले पाहिजे. एनआयए त्यांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. निश्चितपणे या संदर्भात अधिक माहिती मिळेल. दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर टीका करत म्हटले की, मनसुख हिरेन हत्येप्रकरणी शिवसेना उपनेते प्रदीप शर्मांच्या घरी एनआयएची टीम पोहोचली आहे. त्याआधी शिवसेनेचे प्रवक्ते सचिन वाझे जेलमध्ये आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचे पार्टनर कांदीवली प्रमुखाने वाझेला मनसुख हिरेनप्रकरणी प्राडो गाडी दिली होती. ही सगळी उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेची कमाल असल्याची टीका सोमय्यांनी केली. WATCH kirit somayya and Pravin Darekar Says Brain Behind Vaze Is Pradeep sharma
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App