Watch inpiring Story Of paithani face Mask Startup Of Pune Based Housewife

WATCH : पुण्यातील गृहिणीचा पैठणी मास्कचा स्टार्टअप, संकटातही शोधली संधी

inspiring Story Of paithani face Mask Startup : कोरोनाच्या सध्याच्या या परिस्थितीत अनेकांचा रोजगार गेला. नव्याने सुरु केलेला व्यवसायही धोक्यात आला पण काहीनी यातुनही मार्ग काढत आत्मनिर्भर झाले.पुण्यातील धनश्री पाठक या महिलेने पैठणीचे युनिक मास्क तयार करुन अनेकांना रोजगारही दिला.आणि स्वत आत्मनिर्भर झाल्या. नारायण पेठे राहणाऱ्या धनश्री पाठक यांनी मागील तीन वर्षापासून पैठणीपासून ज्वेलरी, टेबल रनरस, पर्स, कुडते, जॅकेट, फ्रॉक इत्यादी वस्तू तयार करण्याचे स्टार्टअप सुरू केले. पण मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यांच्या या व्यवसायाला फटका बसला. पण त्यांनी जिद्द न हरता पैठणी साडीपासून अनोखे मास्क तयार करायला सुरुवात केली आणि याच मास्कच्या व्यवसायाने त्यांना तारले. यातून बारा महिलांना विशेष असा रोजगारही मिळाला. परदेशातूनही या अनोख्या मास्कला मागणी वाढू लागली. तसेच त्यांनी इको-फ्रेंडली पैठणी साडीच्या चप्पलही तयार केल्या असून चपलांच्या तळाशी टायरचे सोल तयार केले आहे. अशा युनिक व्यवसायामुळे अनेकांना आता रोजगार मिळत आहेत. Watch inspiring Story Of paithani face Mask Startup Of Pune Based Housewife

महत्त्वाच्या बातम्या