आफताब – श्रद्धा लव्ह जिहाद हत्येचा विषय उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये टाळला; राज्यपालांविरुद्ध महाराष्ट्र व्यापी आंदोलनाचा इशारा


प्रतिनिधी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची उचलबांगडी करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये केली, पण लव्ह जिहाद मधून आफताब अमीन पूनावालाने श्रद्धा वालकर हिची हत्या केली, या विषयावर मात्र भाष्य करण्याचे उद्धव ठाकरे यांनी या प्रेस कॉन्फरन्स मध्ये टाळले. Warning of Maharashtra wide agitation against Governor

श्रद्धा वालकर हिने 2020 मध्येच आफताब आपल्याला तुकडे करून ठार मारेल. त्याच्यावर कारवाई करा, असा अर्ज वसई मधल्या तुळींज पोलीस ठाण्यात दिला होता. परंतु त्याच्यावर पोलीसांनी कारवाई केली नाही आणि त्यानंतर दोनच वर्षात तिने ज्या पद्धतीने पत्रात लिहिले होते, त्याच पद्धतीने आफताबने तिची हत्या केली. या विषयासंदर्भात उद्धव ठाकरे यांना आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले. हा विषय खूप मोठा आणि गंभीर आहे. तो आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा विषय नाही. त्यामुळे नंतर बोलू, असे सांगून त्यांनी तो विषय थांबवला आणि प्रेस कॉन्फरन्स संपवली.राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांनी त्याआधी देखील सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. राज्यपाल हे वारंवार महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान करत आहेत. त्यांना ताबडतोब महाराष्ट्रातून हटवावे आणि केंद्र सरकारने त्यांना हवे तिथे नेऊन ठेवावे. येत्या चार-पाच दिवसात या कारवाईच्या आम्ही वाट बघू अन्यथा महाराष्ट्र बंद किंवा महाराष्ट्र व्यापी कोणतेही आंदोलन सर्व महाराष्ट्र प्रेमी उभे करू. मी सर्व महाराष्ट्र प्रेमींना तसे आवाहन करतो आहे, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

सावरकरांच्या अपमानावर जुनाच इशारा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला. त्यांच्या मताशी आम्ही असहमत आहोत असे आधीच सांगितले आहे. परंतु, त्यानंतर त्यांनी सावरकरांचा विषय आपल्या भाषणातून टाळला याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. यावेळी मध्येच हस्तक्षेप करून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुद्द्याला एक महत्त्वाचा मुद्दा जोडला. सावरकरांचा अपमान झाला तर महाविकास आघाडी तुटेल. आम्ही महाविकास आघाडीची पर्वा करणार नाही, असा इशारा आधीच दिला आहे. त्याचा पुनरुच्चार राऊत आणि ठाकरे यांनी केला. मात्र महाराष्ट्रात गाजत असलेल्या आफताब श्रद्धा वालकर लव्ह जिहाद हत्या प्रकरणावर मात्र भाष्य करण्याचे उद्धव ठाकरे यांनी टाळले.

Warning of Maharashtra wide agitation against Governor

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण