लोका सांगे ब्रम्हज्ञान पण….अजित पवारांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोरोनाच्या नियमांबाबत अजित पवार सातत्याने लोकांना सांगत असतात. अनेकदा अधिकारी-कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतात. परंतु, पंढरपूर येथे त्यांच्याच सभेत लोकांनी गर्दी करून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. त्याकडे अजित पवारांनी कानाडोळा केला असला तरी नागरिकांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.Violation of corona rules in Ajit Pawar’s meeting, demand to file a case


विशेष प्रतिनिधी 

पंढरपूर : कोरोनाच्या नियमांबाबत अजित पवार सातत्याने लोकांना सांगत असतात. अनेकदा अधिकारी-कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतात. परंतु, पंढरपूर येथे त्यांच्याच सभेत लोकांनी गर्दी करून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. त्याकडे अजित पवारांनी कानाडोळा केला असला तरी नागरिकांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आले. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार पंढरपुरात होते.

यावेळी भाजपा नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांच्या सभेत नियमाचं पालन करण्यात आले नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्ह करत राज्यातील जनतेला निर्बंध पाळत सहकार्य करण्याचं आवाहन केल्यानंतर काही वेळातच ही सभा पार पडली.

यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, एका अथार्ने मोगलाई आली आहे….हम करे सो कायदा. शरद पवारांनी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन केलं. आमचा प्रचंड विरोध होता पण आम्ही सहकार्य केले.

आता अजित पवारांवर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात आहे का? भाजपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, एकीकडे शरद पवार करोनाचे नियम पाळा

म्हणून महाराष्ट्राला आवाहन करतात,तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नियमांची धज्जी उडवली गेली आहे, नियम काय फक्त सर्वसामान्यांना आहेत का पवार साहेब?”पवार साहेब, गुन्हा दाखल करायला सांगणार

का उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध ? करणार नसाल तर आजपासून महाराष्ट्रातील कुणावरही नियम मोडल्याबद्दल सरकारला गुन्हा दाखल करता येणार नाही असेही दरेकर यांनी सांगितले.

Violation of corona rules in Ajit Pawar’s meeting, demand to file a case

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*