कॉँग्रेसचे दलित कार्ड, पदोन्नतीतील मागासवर्गीय आरक्षणावरून अजित पवारांनाच घेरण्याचा डाव

विजय वडेट्टीवारांचा गेम करून सारथी संस्थेवर अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या नियोजन विभागामार्फत कब्जा घेऊन मराठ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला. पण पदोन्नतीतील मागासवर्गीयांच्य आरक्षणाच्या मुद्यावर दलित कार्डद्वारे अजित पवार यांनाच घेरण्याचा डाव कॉँग्रेसने आखला आहे. Congress Dalit card intrigue to surround Ajit Pawar over backward class reservation in promotion


विशेष प्रतिनिधी

मुंबई: विजय वडेट्टीवारांचा गेम करून सारथी संस्थेवर अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या नियोजन विभागामार्फत कब्जा घेऊन मराठ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला. पण पदोन्नतीतील मागासवर्गीयांच्य आरक्षणाच्या मुद्यावर दलित कार्डद्वारे अजित पवार यांनाच घेरण्याचा डाव कॉँग्रेसने आखला आहे.

कॉँग्रेसच्या  अनुसुचित जाती जमातील मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नितीन राऊत यांनी अजित पवार यांना घेरण्याची तयारी केली आहे. उर्जामंत्री असलेल्या राऊत यांनी लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याचे सुतोवाच केले होते. मात्र, अजित पवार यांनी त्यांना विरोध केला.मंत्रीमंडळाच्या बैठकीतही राऊत यांना फटकारण्यात आले. त्याचे उट्टे काढण्याचा प्रयत्न आता राऊत करत आहेत. त्यासाठी मागासवर्गीयांच्या पदोन्नतील आरक्षणाचा मुद्दा त्यांनी हातात घेतला आहे. दलित कार्डला कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते घाबरतात हे ओळखून त्यांनी हा डाव आखला आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जाती, जमाती सेलच्या कार्यकर्त्यांना थेट अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मी स्वत: देखील त्यामध्ये सहभागी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले, दलित-मागासवगीर्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचार्य कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करत आहेत. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही या मोर्चात सहभागी होईल

महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या बैठकीत  अनेक कार्यकर्त्यांनी पदोन्नतीतील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्री उपसमिती बनते. त्याच्या अध्यक्षपदी ओबीसी मंत्र्याला नियुक्त केले जाते. मराठा आरक्षण विषयावर उपसमितीच्या अध्यक्षपदी मराठा मंत्र्याची वर्णी लागते. मात्र पदोन्नतीच्या विषयावरील उपसमितीचे अध्यक्ष दलित मागासमधील मंत्र्यास न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेमण्यात आले, असे का?, असा सवाल राऊत यांनी विचारला.

अजित पवार यांच्या या समितीने भाजप सरकारने काढलेल्या 29 डिसेंबर 2017 चा जीआर रद्द करण्याची शिफारस करूनही अपेक्षित निर्णय झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आकडेवारी गोळा करण्याकरीता सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे नियुक्त करण्याचे ठरले होते. मात्र या नियुक्तीचा जीआर अद्यापही निघालेला नाही.

मंत्रालयातील झारीतील शुक्राचार्य कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करीत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर अनुसूचित जाती प्रदेश काँग्रेसने आक्रमक आंदोलन केल्यास वा उपसमिती अध्यक्षाच्या घरासमोर निदर्शने करायचे ठरविल्यास आपण स्वत: या आंदोलनात सामील होऊ, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष व आमदार प्रणिती शिंदे, आमदार राजू पारवे, लहू कानडे आणि राजेश राठोड यांच्यासह अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय अंभोरे, कार्याध्यक्ष गौतम अरकडे उपस्थित होत.

दलित-मागासवगीर्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दलित-मागासवगीर्यांच्या आरक्षणातील पदोन्नतीच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी अजित पवार आहेत. तरीही  पदोन्नतीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे दलित समाजात प्रचंड नाराजीची भावना आहे. या समितीचं अध्यक्षपद दलित मंत्र्याकडे देण्याऐवजी पवारांकडे देण्यात आल्याने दलित समाजात अस्वस्थता असतानाच आरक्षणातील पदोन्नतीवर अद्यापही निर्णय होत नसल्याने संताप वाढला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीत एकत्र असली तरी त्यांच्यात धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत वाढती जवळीक काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेही या दोन्ही पक्षामध्ये वादाची ठिणगी पडत आहे.

Congress Dalit card intrigue to surround Ajit Pawar over backward class reservation in promotion

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*