काका – पुतण्याचा जेजुरीत “मुळशी पॅटर्न”; गोपीचंद पडळकर यांचा नवा हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

पुणे : काका-पुतण्यांनी जेजुरीत “मुळशी पॅटर्न” राबवून बळकावलेली जमीन आता सुप्रीम कोर्टाने सोडविली आहे म. आम्ही सुप्रीम कोर्टाचा आभारी आहोत, असा नवा हल्लाबोल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. Uncle – “root pattern” in nephew’s jury; Gopichand Padalkar’s new attack

सुप्रीम कोर्टाने देवस्थानांच्या जमीन मालकी संदर्भात नुकताच एक निकाल दिला आहे. संबंधित जमिनींवर देवाची मालकी असेल पुजारी किंवा इतर हक्कदारांची मालकी नसेल. वहिवाटदार यांची मालकी नसेल. ते फक्त देखभालकर्ते असतील, असा हा महत्वपूर्ण निकाल आहे.

या निकालावरूनच गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केले आहे. जेजुरी देवस्थानची 113 एकर जमीन काका-पुतण्यांनी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांनी बळकावल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ही जमीन सोडविण्यात आली आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. काका-पुतण्यांच्या हा जेजुरीतला “मुळशी पॅटर्न” होता. त्यांनी या मुळशी पॅटर्नद्वारे देवस्थानची जमीन बळकावली होती. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ही 113 एकर जमीन सोडविण्यात आली आहे. लवकरच काका-पुतण्यांच्या आणखी पितळ उघडे पडेल, असेही गोपीचंद पडळकर यांनी ट्विटमध्ये स्पष्ट म्हटले आहे.

पडळकर यांचे ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेत असून अन्य देवस्थानांच्या कोणत्या जमिनी कोणी कोणी बळकावल्या आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल त्या देवस्थानांनाही लागू होणार आहे.

Uncle – “root pattern” in nephew’s jury; Gopichand Padalkar’s new attack

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण