उद्धव ठाकरे : खास सामना मुलाखतीतून उरलेली शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न!!

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेत न भूतो अशी खूप मोठी फूट पडलेली आहे. शिवसेना पक्षाचे दोन गट स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड पुकारत भाजपसोबत हातमिळवणी केल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. Uddhav Thackeray Trying to save Shiv Sena left from special match interview

शिवसेना फुटीपासून आतापर्यंतच्या सर्व घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट करणारी रोखठोक मुलाखत ‘सामना’ने घेतली. शिंदे गटाच्या फुटीतून उरलेली शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी या मुलाखती द्वारे केला आहे.


Raj – Uddhav : कोण असली – कोण नकली??; गर्दीच्या भांडणात घरातल्या हिंदुत्वातच जुंपली!!


‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांवर टीका करताना दिसत आहेत.

‘हल्लाबोल, आसूड आणि गौप्यस्फोट’, असा आशय या टीझरच्या शेवटी लिहिला आहे. उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत 26 आणि 27 जुलैला सामनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली जाणार आहे. संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतल्याने या मुलाखतीला विशेष महत्त्व आहे.

Uddhav Thackeray Trying to save Shiv Sena left from special match interview

महत्वाच्या बातम्या