विशेष प्रतिनिधी
मुंबई : कॉँग्रेसच्या मंत्र्यांना ठाकरे मंत्रीमंडळात कवडीची किंमत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊजार्मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पत्राला उध्दव ठाकरे यांनी कचऱ्याची पेटी दाखविली आहे.Uddhav Thackeray dumped Nitin Raut’s letter requesting postponement of elections
राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने करोनाची स्थिती बघून निवडणुका पुढे ढकलण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाला दिली.
त्या पार्श्वभूमीवर डॉ. राऊत यांनी लिहिले आहे की, राज्य मंत्रिमंडळाने आपल्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात यावे, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
तसंच सध्याची करोना स्थिती पाहता नागपूरसह राज्यातील पाच जिल्ह्यात आणि ३३ पंचायत समित्यांसाठी जाहीर करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंतीही राज्य सरकारने आयोगाला केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै रोजी विषयावर झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला करोना स्थितीचा आढावा घेऊन निवडणुका पुढे ढकलता येतील, अशी मुभा दिली आहे. या निवडणुकीसाठी येत्या १९ जुलैला मतदान होणार आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी जाहीर केलेला कार्यक्रम करोना स्थिती पाहता आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनुमतीचा विचार करता राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ पुढे ढकलावा, यासाठी आपल्या पातळीवर पाठपुरावा करण्यात यावा.ही निवडणूक लांबणीवर टाकली गेल्यास ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळवून द्यायला मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App