मराठा समाजाला उध्दव ठाकरेंनी वेड्यात काढले तर अशोक चव्हाणांनी वाटोळे केले, विनायक मेटे यांचा आरोप


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला वेड्यात काढले तर अशोक चव्हाणांनी मराठा समाजाचे वाटोळे केले असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.Uddhav Thackeray drives Maratha community crazy, Ashok Chavan scolded, Vinayak Mete accused


विशेष प्रतिनिधी

सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला वेड्यात काढले तर अशोक चव्हाणांनी मराठा समाजाचे वाटोळे केले असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.
मराठा आरक्षण जनजागृती राज्यव्यापी दौºयाच्या निमित्ताने आमदार मेटे सोलापूर दौºयावर होते.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा व हलगर्जीपणाच मराठा आरक्षण रद्द होण्याला कारणीभूत ठरला आहे. मराठा आरक्षण सुनावणी ते स्थगितीपर्यंत व नंतर आरक्षण रद्द होण्याच्या कालावधीपर्यंत ठाकरे सरकारने अक्षम्य चुका केल्या आहेत.



सुनावणीला उपस्थित न राहणे, भाषांतर न करणे, नको असलेली कागदपत्रे दाखविणे, योग्य वकील न दिल्याचे परिणाम आज मराठा समाजाला भोगावे लागत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी ५ जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास ७ जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही.

मराठा समाजाच्या मतांची ज्यांना गरज आहे त्या आमदारांनी आपापल्या पक्षाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणावा. विरोधी पक्षानेसुद्धा सरकारवर दबाव आणला पाहिजे. जमत नसेल तर भाजपने शिवसंग्रामसोबत रहावे असे आमदार मेटे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी माओवाद्यांच्या पाठिंब्याचे पत्र हा महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशाराही मेटे यांनी दिला.

मेटे म्हणाले, मराठा समाजाला खोटे बोलून फसविण्यात आले आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे तरुणांमध्ये सरकारविषयी प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम दिल्लीला धावतपळत गेली आणि धूम ठोकत मुंबईला आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत नेमका कोणता निर्णय झाला याचा तपशील बाहेर येणे गरजेचे आहे.

मागासवर्गीय आयोग स्थापन झाला पाहिजे. फेरविचार याचिका दाखल झाली पाहिजे. ओबीसी बांधवांना आरक्षण व सोयी-सवलती तसेच संरक्षण सवलती लागू झाल्या पाहिजेत. सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज भवन प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजे.

प्रत्येक जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि सारथीचे विभागीय कार्यालयही झाले पाहिजे.मराठा आरक्षणासाठी माओवाद्यांच्या पाठिंब्याचे पत्र म्हणजे महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे असे सांगून मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या माध्यमातून माओवादी महाराष्ट्रात शिरकाव करतील.

मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे यातील पिचलेली मुले व विद्यार्थी माओवाद्यांच्या जाळ्यात अडकले तर महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने, तसेच सामाजिक व विकासात्मकदृष्टीने धोक्याचे ठरणार आहे. मात्र, महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहेत तेच त्यांचा बंदोबस्त करतील.

Uddhav Thackeray drives Maratha community crazy, Ashok Chavan scolded, Vinayak Mete accused

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात