मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आगीचा थरार, धावती दोन वाहने पेटली

विशेष प्रतिनिधी

खोपोली – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई मार्गिकेवर रात्री ट्रक आणि कारने अचानक पेट घेतला. काही वेळाच्या अंतरामध्ये घडलेल्या या दोन्ही घटनांत कार जळून खाक झाली, तर दुसऱ्या घटनेत मालवाहू ट्रकचे टायर जळाले. आगीत कारमधील चार जणांचा जीव वाचला. ट्रकचा टायर फुटल्यामुळे, तर कारमध्ये शार्टसर्किटने आग लागल्याचे समजते.Two vehicles trapped in fire

पहिली घटना रात्री बारा वाजता घडली. कारने अचानक पेट घेतला आणि ती काहीवेळात जळून खाक झाली. दैव बलवत्तर म्हणून त्या कारमधील चार प्रवाशांना इजा झाली नाही. कारचालकाला आग लागल्याचा अंदाज येताच त्याने कार थांबवल्याने सर्वजण बाहेर पडले. 

दुसरी घटना खालापूर टोल नाक्याच्या मागे घडली. यात ट्रकचे टायर खाक झाले. या घटनेतही कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले नाही; मात्र या दोन्ही घटनांनी मध्यरात्री द्रुतगती मार्गावर आगीचा थरार पाहावयास मिळाला.

Two vehicles trapped in fire

महत्त्वाच्या बातम्या