शिवसेनेच्या आणखी दोन आमदारांची अस्वस्थता बाहेर!!


प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष असला तरी शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता आणखी दोन आमदारांच्या मुखातून बाहेर आली आहे.Two more Shiv Sena MLAs out of discomfort

शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील या दोन्ही नेत्यांनी आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाची राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे.



एसटी महामंडळाचे विलीनीकरण सध्या शक्य नाही, असे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते अनिल परब यांनी स्पष्ट करून देखील आमदार संतोष बांगर यांनी अशी आपली मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट पत्राद्वारे पोहोचवली आहे.

एकीकडे आपल्याच मंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात हे पत्र असताना दुसरीकडे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यात शिवसेनेची फक्त 1100 मते आहेत. भाजपची मते जास्त आहेत आणि त्यांच्याच बळावर मी सांगोल्यातून निवडून आलो आहे, असे वक्तव्य केले आहे. हाच तो सांगोला मतदारसंघ आहे आहे जिथून शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख हे दिग्गज आमदार सतत 11 वेळा विधानसभेत पोहचले होते.

सांगोल्याने त्यांच्यानंतर शिवसेनेचे आमदार नेते शहाजीबापू पाटील यांना आपला कौल दिला आहे. गणपतराव देशमुख यांच्या नातवाचा या निवडणुकीत पराभव झाला होता. ही निवडणूक भाजपच्या मतांवर हे आपण जिंकलो कारण शिवसेनेची फक्त सांगोल्यात 1100 मते आहेत, असे परखड बोल शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना नेतृत्वाला ऐकवले आहेत

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे नेते सर्वात अस्वस्थ आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप अनेक शिवसेना आमदारांनी केला आहे. प्रताप सरनाईक, अजय चौधरी यांच्यासारख्या ठाणे – मुंबईतल्या आमदारांनी उघडपणे याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर या सगळ्यांचा राग आहे. त्यानंतर माजी खासदार अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री रंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर राग आहे. त्यांनी उघडपणे बोलून दाखवला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शिवसेनेतली अस्वस्थता हिंगोली आणि सांगोला या सारख्या दूरवरच्या ग्रामीण भागातही पोहोचल्याचे दिसत आहे.

Two more Shiv Sena MLAs out of discomfort

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात