– 94.22 % विद्यार्थी पास, कोकण विभागाचा सर्वाधिक 97.21 % निकाल Twelth result was good
प्रतिनिधी
मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा यंदाचा निकाल निश्चितच चांगला म्हणजे 94.22 % लागला आहे. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली. मुलांपेक्षा मुली अधिक संख्येने पास झाल्या आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे.
– नागराज मंजुळेची फेसबुक पोस्ट
तरी प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेत्री छाया कदम यांचा फेसबुक पोस्ट चर्चेत आहेत. या दोघांनीही दहावी – बारावीचे निकाल म्हणजे आयुष्य नाही अपयश आले तरी खचून जायचे कारण नाही जिद्दीने अपयशावर मात करता येते, असे आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिले आहे. बारावी आणि दहावीच्या निकालातून निराशा येऊन कुठली टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन या दोघांनी केले आहे. नागराज मंजुळे दहावीत दोनदा नापास झाले होते. परंतु, आपण पास झालो असतो तर फक्त पुढच्या वर्गात गेलो असतो. पण नवीन करण्याची उमेद आणि जिद्द तयार झाली नसती. दहावीतल्या अपयशाने बरेच काही शिकवले, असे नागराज मंजुळेने फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
– छाया कदमची फेसबुक पोस्ट
छाया कदम यांनी देखील बारावीत अपयश आल्यानंतर आत्मपरीक्षण केल्यामुळे आपल्यातले सुप्त गुण अधिक कळले पठडी बाज शिक्षणापेक्षा जीवनातले शिक्षण जास्त महत्त्वाचे आहे मी कबड्डी या खेळात प्राविण्य मिळवले होते त्यामुळे अपयशाने खचून जाण्यापेक्षा जिद्दीने त्यावर मात करावी हे मला त्या खेळाने शिकवले आपणही क्वचित प्रसंगी अपयशाने किंवा कुठे कमी पडलो तर खचून न जाता पुढे जात राहिले पाहिजे असे छाया कदम यांनी म्हटले आहे.
– असा पाहा निकाल
मंडळाच्या www.mahahscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला आहे. संकेतस्थळावर गेल्यावर होम पेजवर इयत्ता 12 वी निकाल 2022 ही लिंक पहावी. क्लिक केल्यावर नवे पेज उघडेल. तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मदिनांक टाकून सबमिट केल्यावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. या वर्षी 14 लाख 85,826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
– विभागनिहाय निकाल
पुणे: 93.61% नागपुर: 96.52% औरंगाबाद: 94.97% मुंबई: 90.91% कोल्हापूर: 95.07% अमरावती: 96.34 % नाशिक: 95.03% लातूर: 95.25% कोकण: 97.21%
Twelth result was good
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App